मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध.
प्रभाग रचना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत.
आता प्रतिक्षा आरक्षणाची..!
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०११ ची जनगणना विचारात घेऊन शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग निश्चित करण्यात आले असून २० नगरसेवक संख्या असणार आहे.
१७ नगरसेवक असलेल्या नगरपरिषद मध्ये वीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष असे २१ जण असणार आहेत. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
प्रभाग रचना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदरच्या हरकती व सूचना नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. पालिकेची प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जाहीर केली आहे. यापुढे सर्वांचे लक्ष प्रभागांतील आरक्षणाकडे लागून राहणार आहे.
नगराध्यक्ष जनतेतूनच निवडले जाणार असे सध्या तरी स्पष्ट आहे अशी माहिती मिळत आहे आणि मात्र आरक्षणाची प्रतिक्षा सर्वांना असेल असे समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)