युवासेना मालवण शहराध्यक्षपदी आनंद पराडकर.
युवासेना मालवण शहराध्यक्षपदी आनंद पराडकर.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र.
मालवण | ब्यूरो न्यूज : युवासेना मालवण शहराध्यक्ष पदी दांडी येथील आनंद राजेंद्र पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पराडकर यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या मालवण शहर युवा शहराध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. ह्या नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल.
यावेळी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, विश्वास गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, शिवसेना मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, शहर संघटक राजू बिडये, नारायण धुरी, विभाग प्रमुख मंदार लुडबे, राजा तोंडवळकर, महिला उपतालुकाप्रमुख पुजा तोंडवळकर, कुडाळ सचिव रेवती राणे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, आराध्या करलकर यांसह आबा पराडकर, नूतन रोगे, विनायक खवणेकर, राजू खवणेकर, भरत सारंग, निलेश केळुसकर, सचिन तारी, नागेश खवणेकर, दर्शन पराडकर, निखिल पराडकर, विजय भगत, दिनेश तोडणकर, प्रेम लुडबे, प्रथमेश पेडणेकर, राजू हुर्णेकर, आदर्श पराडकर, रुपेश धुरी, दिनू रोगे, अशोक कराडे, सुजित मोंडकर, साहिल पराडकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)