मालवणात तिरंगा रॅली.
भाऊ सामंत यांचे नागरीकांना सहभागाचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : अखंड भारताचे स्मरण व भारतीय स्वतंत्र दिनाचे स्वागत अनुषंगाने मालवणात देशप्रेमी नागरिकांच्या सहभागातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मोटारसायकल सहभागतून ही रॅली असणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, मालवण शहरातील तारकर्ली नाका, भरड येथून तिरंगा रॅली सुरू होईल आणि कुंभारमाठ हुतात्मा स्मारक येथे तिची सांगता होईल. विविध संस्था या रॅलीत सहभागी होत आहेत अशी माहिती मिळत आहे.
नागरिकांनी देखिल या रॅलीत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाऊ सामंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)