ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायरी भूतनाथ येथील अनेक कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांसह भाजप प्रवेश.

वायरी भूतनाथ येथील अनेक कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांसह भाजप प्रवेश.

प्रकाशन: 13 Aug 2025 12:05 PM
वाचन संख्या 280

वायरी भूतनाथ येथील अनेक कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांसह भाजप प्रवेश.


जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर व पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत.


मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपचे तालुका उपाध्यक्ष केदार झाड यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात उबाठा कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थांनी मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश केला. प्रवेश कर्त्यांमध्ये युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


Article image


जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह तालुका मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर व पदाधिकाऱ्यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.


यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या पक्षात तुम्ही आता प्रवेश केला आहे. १९९२ पासून मी या मतदार संघात काम करत आहे. देवबाग आणि वायरी भूतनाथ मतदार संघ हा नेहमीच आमचे नेते नारायण राणे साहेबांचा जवळचा राहिला आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील भारतीय जनता पक्ष नेहमीच येथील नागरिकांसोबत राहणार आहे, असे ते म्हणाले.


तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आज आपण पाहत आहोत, विकास आणि रोजगारासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे. अनेक विकासात्मक प्रकल्प, विकासकामे ठिकठिकाणी सुरू आहेत. काही ठिकाणी होऊ घातली आहेत. भारतीय जनता पार्टीने तळागाळात काम केले असल्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत आपण विजय संपादन केला. देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान महत्वाचे आहे, असे सांगून भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांचेच त्यांनी स्वागत केले.


शहर अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ दिल्यामुळे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघात तालुक्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य आपण घेऊ शकलो. येणाऱ्या काळात युवा आणि महिला मोर्चावर आपणास काम करावयाचे आहे. याठिकाणीं अनेक समस्या होत्या. या समस्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्याचे ते म्हणाले. तर महेश मांजरेकर यांनी नवनियुक्त बूथ अध्यक्षांना मार्गदर्शन करताना जनतेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे काम कसे पोहोचेल याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे सांगून आपल्या बूथ मधील सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बूथ अध्यक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले.


या पक्ष प्रवेशाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, पंकज सादये, देवानंद लोकेगावकर, रवींद्र खानविलकर, संदीप बोडवे, सहदेव साळगावकर, राम चोपडेकर, मिलिंद झाड, शाम झाड, मनोज झाड, पूजा झाड आदी उपस्थित होते. यावेळी समीर पाटकर, लिलाधर झाड, जगदीश वेंगुर्लेकर, चिन्मय आचरेकर, मंदार झाड, हेमंत वस्त, यतीन मालवणकर, विनोद नांदोसकर, मुकेश आचरेकर, संजय वस्त, सुशांत सुर्वे, सुनील वेंगुर्लेकर, दीपेश नांदोसकर, मैथिली टिकम, शुभम चिंदरकर, अमित पालकर, निखिल साळवी, चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.


सौजन्य | मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स