कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग स्टेशनच्या नूतन कार्यकारणी निवड
कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग स्टेशनच्या नूतन कार्यकारणी निवड जाहीर.
ओरोस | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटनेच्या अध्यक्षपदी आप्पा मांजरेकर तर सचिवपदी सुमीत सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग स्टेशनची नूतन कार्यकारणी निवडीची बैठक स्टेशन आवारात संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष परशुराम परब, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव अजय मयेकर, जिल्हा सहसचिव साई आंबेरकर, जिल्हा खजिनदार स्वप्निल गावडे आदींसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी नारायण (आप्पा) मांजरेकर तर उपाध्यक्ष पदी पांडुरंग मालवणकर, सुभाष लाड, लता खोत, प्रणाली अवसरे यांची निवड झाली आहे. कार्यकारणी सचिवपदी सुमित सावंत, सहसचिव पदी राहुल शिर्के, विशाल मसुरकर तर कार्याध्यक्ष पदी सुनील पाताडे यांची निवड झाली आहे.
खजिनदार पदी सुशील निब्रे, सहखजिनदार सुशील गावडे तर सोशल मीडिया प्रमुख पदी मंदार पडवळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारणी सल्लागार म्हणून बापू वायंगणकर, उदय दळवी, कृष्ण भोगवेकर, भाई राणे, सुहास भोजने, सुप्रिया वालावलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारणी सदस्य पदी बाबुराव गावडे, गोपाळ बोभाटे, चंदू सावंत, स्वप्निल वेंगुर्लेकर, नामदेव जाधव, यशवंत राऊळ, कुणाल फाटक, प्रसाद मुसळे, सचिन मयेकर, अरुण घोगळे, अशोक परब, जयराम सावंत यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)