शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव-बौद्धवादी येथील सुप्रसिद्ध गोल्ड मेडलिस्ट जादूगार, लेखक, कवी, गीतकार,गायक भरतकुमार नाईक यांना राज्यस्तरीय विश्वसमता समाजभूषण पुरस्कार 30 जाने. रोजी रत्नागिरी येथे मनाचा पट्टा, मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विश्वसमता कलामंच लोवले (रजि. )ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी कार्यक्षेत्र महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतीक, धार्मिक, सहकार कला क्रीडा, जल, पर्यावरण या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन कबनूरकर हॉल साखरपा रत्नागिरी येथे मानाचा पट्टा, मानचिन्ह,व सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शिरगांव बौद्धवाडी ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथील लेखक, कवी गीतकार गायक, आर्टिस्ट, व महाराष्ट्रचे सुप्रसिद्ध जादूगार भरत मनोहर नाईक यांना विश्वसमता समाजभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांनी सपत्नीक स्वीकारला . त्याचवेळी फोंडाघाट ता. कणकवली चे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक, प्रबोधनकार डीडी उर्फ यांनाही जनीकुमार कांबळे गुरुजी यांना साहित्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तशेच कणकवली चे उत्कृष्ठ निवेदक राजेश कदम यांचा ही सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष मनोज जाधव कोकण चे गाडगेबाबा मारुती काका जोशी व सर्व मान्यवरांच्या उपस्तितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भरत नाईक हे उत्कृष्ट कवी,गीतकार असून त्यांना दर्जेदार उत्कृष्ट काव्यलेखन केल्या बद्धल विश्वरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर साहित्यिक विचारमंच भारत या संस्थेकडून सन्मान पत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या प्रसंगी रजनी कापसे, बिजितकर यांनी त्यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
या यशा मध्ये, वैभववाडीच्या सभापती डाफळे मॅडम, उप सभापती अरविंद रावराणे , लक्ष्मण रावराणे तशेच शिरगांव सरपंच समीर शिरगांवकर, मसुरे हायस्कुल चे मुख्याध्यापक चव्हाण, सुनीत बाबा डांगमोडेकर ,एम पी डब्लू ओसरगांव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच त्यांच्या यशामागे त्यांच्या सौ. नेहा नाईक या पूर्णांगिनीचा मोठा वाटा आहे असे त्यांनी आपल्याभावना व्यक्त करताना सांगितले आहे.या पुरस्काराबद्दल शिरगांव दशक्रोशीतून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.