साळशी येथील आकांशा कॅश्यु कंपनीत शेतकरी मेळावा.
साळशी येथे होणार कृषी सेवा केंद्र.
शिरगांव | संतोष साळसकर : जगात सहकारक्षेत्र फार मोठे आहे. ब्रिटिशांनी भारतात १९०४ साली सहकार क्षेत्र सुरू केले. शेतकरी आणि सैनिक हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. याच भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकानी ‘जय जवान जय किसान’ हा नारा अंगीकृत करत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हि संस्था स्थापन केली. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व त्यांच्या न्यायासाठी गेली ५ वर्षे कार्यरत ही संस्था कार्यरत आहे. शेतकरीवर्ग संघटीत होऊन ‘इकॉनॉमिक झोन’ मध्ये आला तरच देशाचा ‘ जिडीपी’ वाढेल असे प्रतिपादन में. वेंकटेश्वरा को. ऑप . पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग नाशिकचे व्हॉईस चेअरमन विवेकानंद वाघ यांनी साळशी येथे केले. देवगड तालुक्यातील साळशी येथील में, आकांक्षा कॅश्यु ऍग्रो. प्रा. लि. यांच्या समन्वयाने में. वेंकटेश्वरा को. ऑप. पावर प्रोसेसिंग नाशिक (भारत सरकार अंतर्गत) यांच्या संयुक्त विद्यमाने साळशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शेतक-यांच्या कच्चा मालाला भाव मिळत नाही मात्र त्यावर प्रोसेसिंग (प्रक्रीया) केली तर त्यास चांगली किंमत मिळते, यासाठी या संस्थेचे सभासद व्हा. मग तालुक्यात कृषी सेवा केंद्र सुरु करून या माध्यमातून शेतक-यांना खते, औषधे, बियाणे रास्त भावाने देण्यात येतील. माती व पाण्याचे परिक्षण करण्यात येईल. शेतक-यांचा माल बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केला जाईल. झाडाच्या संगोपनासाठी तज्ञाचे मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले, यावेळी बोलताना माजी जि. प. सदस्य सुनील गावकर यांनी सांगितले की तालुक्यात होणारे कृषी सेवा केंद्र हे साळशी येथे व्हावे अशी मागणी केली. त्याला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी होकार दर्शविला. कार्यक्रमाची सुरवात श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवराचा शाल श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या संस्थेचे कोकण विभागाचे समन्वयक श्रीराम कदम, व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप करमळकर यांनीही संस्थेची वाटचल व विविध उपक्रमा विषयी दिली. साळशी सरपंच वैशाली सुतार, कुवळे सरपंच सुभाष कदम, माजी प.स. सदस्य सुनील गावकर यांनीही या उपक्रमाची प्रशंसा केली. आकांक्षा कॅश्यु ॲग्रो प्रा. लि. चे अध्यक्ष राजेंद्र नाईक यांनी, या संस्थेच्या माध्यमातून शेतक-यांना सुवर्णसंधी आली असून त्याचा फायदा घ्या. शेतक-याच्या या सभासद वर्गणीमध्ये ५० टक्के रक्कम आकांक्षा कॅश्यु प्रा. ली. उचलेल असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर साळशी सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, कुवळे सरपंच सुभाष कदम, माजी जि.प. सदस्य सुनिल गावकर, साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सावंत, मे. वेंकटेश्वरा को. ऑप. पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लि. चे उपाध्यक्ष विवेकानंद वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप करमळकर, कोकण विभागाचे समन्वयक श्रीराम कदम, पुणे विभागाचे समन्वयक संजय आंग्रे, संसंथेचे संचालक संतोष ढोले, मे. आंकांक्षा कॅश्यु कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र नाईक, संचालक चंद्रकांत जांभळे, जयवंत सावंत, मंत्रालय (मॅको) बँक व मुंबई सचिवालय जिमखाना चे संचालक संजय कदम, डॉ. बी. जी. शेळके तसेच पंचक्रोशीतील चाफेड चे माजी सरपंच आकाश राणे, साळशी पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, विजय परब, बाळा नाईक, साळशी माजी सरपंच अनिल पोकळे, किशोर साळसकर, बाळा ताम्हणकर, कुवळे माजी सरपंच सौ. संगीता कदम, अजय कदम, विजय सुतार, प्रवीण नाईक, विक्रांत नाईक, जिजी घाडी, माजी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा सुगंधा साटम आदींसह साळशी, चाफेड व कुवळे गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्लाईड शो द्वारे या उपक्रमाची माहिती तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कदम, सूत्रसंचालन रोहन नाईक तर आभार संजय कदम यांनी मानले.