ब्युरो न्यूज | क्रीडा : माजी कसोटीपटू विनोद कांबळी याला रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात कार्यक्रमाला आचरेकर सरांनी घडवलेल्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी विनोद कांबळीची शारिरीक स्थिती अशक्त असल्याचे दिसले होते. दरम्यान त्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहून कपिल देव यांच्यासह काही माजी क्रिकेटपटूंनी त्याची रीहॅबिटेशन सेंटरला जायची तयारी असल्यास मदतीची तयारी आहे असे स्पष्ट केले होते.
आता विनोद कांबळीला प्रकृती ठाण्यातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ही गोष्ट रीहॅबिटेशन उपचारांचाच एक भाग आहे की त्याची प्रकृती ढासळली आहे याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान डिजीटल सामाजिक मंचावर प्रसारीत झालेल्या एका व्हिडिओ मध्ये विनोद कांबळी साठी उपलब्ध आरोग्य सुविधा व तज्ञ डाॅक्टर उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत आहे