वायंगणी देऊळवाडीत चोरीची धक्कादायक घटना.
आचरा | प्रतिनिधी : आचरा गावाजवळील वायंगणी देऊळवाडी येथे दुचाकीवरुन ( मोटारसायकल) वरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सुपारी मागायचा बहाणा करत, वृद्ध दांपत्याला लुटून चोरीच्या ऐवजासह पोबारा केल्याची घटना आज सोमवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान घडली आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर (वय ७७ आणि त्यांची पत्नी सुप्रिया साळकर (वय ७०) या वृद्ध दांपत्याने त्यांच्यासोबत घडल्या प्रकाराबाबत ही माहिती दिली आहे. आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
श्री. दामोदर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सकाळी तुलशीवृदांवनास अगरबत्ती लावून घरात येत असताना आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सुपारी मागण्याचा बहाणा करत घरात घुसले. त्यांनी दामोदर साळकर यांचे रुमालाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्याने साळकर यांनी ओरड मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील तीन सोन्याच्या साखळ्या ( चेन) मागून ओढून पळ काढला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर व गळ्याला देखिल जखम झाली. दुसर्या चोरट्यांने सौ. सुप्रिया दामोदर साळकर यांच्या गळयातील मंगळसूत्र ओढून पळ काढला. मंगळसूत्र व तीन चेन मिळून साळकर यांचे सुमारे पाच तोळ्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला असल्याचे साळकर यांनी सांगितले. हे चोरटे हे काळ्या स्प्लेंडर वरुन आल्याचे व एक जाडा आणि एक किरकोळ शरीरयष्टीचे असल्याचे त्यांना पाहिलेल्या वायंगणी येथील बापु सावंत यांनी सांगितले. चोरीची मिहिती मिळताच दामोदर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण सकाळी तुलशी वृदांवनास अगरबत्ती लावून घरात येत असताना आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सुपारी मागण्याचा बहाना करत घरात घुसले. त्यांनी दामोदर साळकर यांचे रुमालाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्याने साळकर यांनी ओरड मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील तीन चैनी मागून ओढून पळ काढला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर व गळ्याला जखम झाली तर दुसर्या चोरट्याने सौ सुप्रिया दामोदर साळकर यांच्या गळयातील मंगळसूत्र ओढून पळ काढला. मंगळसूत्र व तीन चैनी मिळून साळकर यांचे सुमारे पाच तोळ्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला असल्याचे साळकर यांनी सांगितले.
चोरीची मिहिती मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे प्रभारी स. पो. नि. सागर खंडागळे पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, सुदेश तांबे, महिला पोलीस तांबे, मनोज पुजारे यांसह सरपंच रुपेश पाटकर, सदा राणे, चंदू सावंत, सचिन रेडकर यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली होती.