प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वराड – घोडवळवाडी येथील प्रतिष्ठित नागरीक सोनू उर्फ भरत सदाशिव हरकुळकर ( ६० ) यांचे शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने गुजरात येथील उमरगाव येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, जावई, एक भाऊ, भावजय, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. शिरगांव पत्रकार प्रतिनिधी संतोष साळसकर यांचे ते सख्खे चुलत मामा होत.