शिरगाव | प्रतिनिधी : गेली १० वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना भाऊ, मुलगा, आणि मित्र म्हणून माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखविलात. आता हक्काचा आमदार म्हणून विश्वास देतो की शिरगावच्या भागाचा विकासासंदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. तुम्ही कामाचे एक निवेदन दिले तर ३ प्रमाणे निधी दिला जाईल. असे मत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शिरगाव येथे व्यक्त केले. आमदार नितेश राणे हे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री झाल्यावर त्यांचे शिरगाव येथे भव्यदिव्य व जल्लोषात जोरदार फटाक्याच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नाम. नितेश राणे यांचे शिरगाव येथे आगमन झाल्यावर त्यांचे ढोलताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत जेसीबीच्या माध्यमातून भव्य पुष्पहार घालण्यात आला. त्यांच्या नावाचा जयजयकार करत घोषणा देण्यात आल्या. शिरगाव पंचक्रोशीत पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आम.अजित गोगटे,सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका मंडळ अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, भाजपा युवा मोर्चाचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम, माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, संतोष किंजवडेकर, शिरगाव सरपंच समीर शिरगावकर, उपसरपंच संतोष फाटक, सत्यवान सावंत, महेश पाटोळे,नंदू देसाई,सुनिल गावकर, शैलेंद्र जाधव, विशाल साटम, ग्रामपंचायत सदस्य स्वाती साटम, प्रेरणा कुबडे, शितल तावडे, वैष्णवी आईर, श्रेया धुळप, प्राची तावडे, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, माजी सरपंच सत्यवान भोगले, चाफेड माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण राणे, सुनील कांडर, महेश पाटोळे, तुकेश परब, नंदू देसाई, शिरगाव पंचक्रोशीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.