कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उद्योजक केशव भिसे व मान्यवरांची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनासारखे सहशालेय उपक्रम राबविणे हे प्रत्येक शिक्षण संस्थांचे काम असून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच दक्ष आहे विद्यार्थ्यांनी जिद्द आत्मविश्वास, कठोर परिश्रम यांच्या साथीने प्रगतीचे शिखर गाठावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी येथे बोलताना केले.
कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक केशव भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर कट्टा वरची गुरामवाडीचें सरपंच तथा क. पं. शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष शेखर पेणकर उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सदस्य स्वाती वराडकर, सदस्य महेश वाईरकर, वराडकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ध्वजेंद्र मिराशी माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर, श्रद्धा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या हस्ते उद्योजक केशव भिसे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली
दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात कोळीनृत्य, गोंधळ, धनगरी नृत्य, शिमगा, दिपनृत्य, बाल्याडान्स आदी नृत्य प्रकार तसेच दशावतारी नाटक, फुगडी यांचा समावेश असलेला महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले शेवटी ऋषीकेश नाईक यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय पेंडूरकर यांनी केले