उचकी
मालवण | संपादकीय विशेष : संपूर्ण महाराष्ट्र हा अस्सल व अभिजात पत्रकारितेसाठी ओळखला जातो.
दर्पणकार व त्यांनी बजावून ‘समजावलेली’ लेखणी यांतील अंतर आज डिजिटल माध्यमांमुळे बदलत गेलेय व वरवर तुलनात्मक सोपे झालेय असे जरी वाटत असले तरिही आजच्या पत्रकारांची जबाबदारी ही संपूर्ण वैश्विक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक बदलांमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी पट वाढलीय.
2006/07 च्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक असेच एक अंतर ‘अंतर ते अनांतर’ जाणायला व जाणवायला लावणारे एक नांव पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत झाले.
बातमीत “मी” नसतो तरच ती बातमी हे त्या माणसाचे कौटुंबिक संस्कार कारण घरात पत्रकारितेचे खुले पण अभ्यासू अंगण त्याला लाभले होते.
परंतु ते साध्य करायची एक ‘उचकी’ लागते ती कोणी लावू शकत नाही तर ती लावावी लागते.
लेखणी त्याला परकी नव्हतीच शिवाय सादरीकरणाचीही त्याची नेटप्रॅक्टीस उत्तम होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईत गेल्यानंतरचे कष्ट त्याच्या लेखणीने कधी स्वतः लिहीले नाहीत आणि त्यांवर विचार करण्यापेक्षा प्रत्येक समृद्ध होऊ पहाणार्या पत्रकाराने आज त्याची उचकी लागणे व त्यावरील जलतृष्णा कशी शिस्तबद्ध भागवणे याची एक ओळख तो करुन देतो.
ॠषी श्रीकांत देसाई असे ती उचकी लागून अंतर ते अनांतर कापणारे एक पत्रकारितेतील नांव.
बातमी या प्रकाराला क्षणोक्षणी नविन वाव असतो परंतु आपण किती वावांत जाऊन बातमी करायची याची एक प्रत्येकाची हिंमत व अभ्यासर्यादा असते.(वाव म्हणजे समुद्री खोली तथा फॅदम)
महाराष्ट्र राज्याने त्याचा “फटका” हा त्याच उचकीतूनच शोधलेला कार्यरत प्रकल्प आहे.
पत्रकारांच्यात भेद नसतो,सत्कृतीचे जाहीर कौतुक असते हे समजावता समजावता तो पत्रकारितेतील फरक अगदी न बोलता स्पष्ट करतो.
लेखणी हिच तलवार जरी असली तरी ती कोणाला मारण्यासाठी नाही तर तारण्यासाठी असे शिकवलेल्या आदरणीय बाळ शास्त्री जांभेकर या पितामहांचा एक नातूही आपण समजू शकतो..जो नातू “ना तू..व ना मी”…फक्त “बातमी” शोधू पहातो.
संपूर्ण आपली सिंधुनगरी चॅनेल परिवारातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकार, व मराठी आधुनिक पत्रकारीतेतील ‘ॠषी श्रीकांत देसाई’ नामक पत्रकारीता स्तंभाला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मुख्य संपादक. (आपली सिंधुनगरी चॅनेल)
(शुभेच्छुक: उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ),राकेश परब, विवेक परब, सौ.प्राजक्ता पेडणेकर, संतोष साळसकर, अमोल गोसावी, लव्हिना डिसोजा. (वैशाली पंडित (सहसंपादक),सहिष्णू पंडित (सहसंपादक),श्री.विजय रावराणे (संचालक), फिलोमीना पंडित (संचालक),दिनेश किडये (संचालक)