प्रतिनिधी : नाताळ सण २०२४ च्या पार्श्वभूमीवर शहरात ख्रिस्ती बांधवांकडून भव्य फ्लोट काढण्यात आली. सावंतवाडी कॅथोलिक असोसिएशनच्या माध्यमातून ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेस शहरवासियांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
येशूने दिलेला सामाजिक बांधिलकीचा संदेश या यात्रेतून देण्यात आला. येशू जन्मासह सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे तसेच सामाजिक प्रबोधन करणारे आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. कॅथोलिक असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा घेत यातील सर्वोत्कृष्टांना सन्मानित करण्यात आले. या यात्रेदरम्यान नाताळबाबा सोबत अनेकजण सेल्फी घेत होते. छोट्या मुलांना नाताळबाबाने चॉकलेट व गिफ्ट दिलं. मिलाग्रीस हायस्कूलपासून या फ्लोटला सुरुवात झाली. ही शोभायात्रा पाहण्यासाठी मोती तलावाकाठी मोठी गर्दी केली होती. ख्रिस्ती बांधवांनी नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.
याप्रसंगी ख्रिस्ती बांधवांचे फादर मिलेट डिसोझा, रिचल्ड साल्डना, फिलीप गोन्सालवीस, रॉजर डिसोझा, जॉय डान्टस, जॉनी फेराव, मार्टिन आल्मेडा, जेम्स बोर्जीस, जोसेफ आल्मेडा, रूजाय रॉड्रिक्स, आगोस्तीन फर्नांडिस आदींसह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.