मसुरे एज्युकेशनच्या अध्यक्षपदी डॉ दीपक परब यांची फेर निवड!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मसुरे एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था जिल्ह्यात अग्रणी रहावी यासाठी सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन आवश्यक आहे. मसुरे पंचक्रोशीतील जास्तीत जास्त विध्यार्थी आपल्या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेतील यादृष्टीने पुढील काळात सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी मुंबई येथे केले.मसुरे एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दादर- मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढिल तीन वर्षासाठी संस्था अध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण परब यांची फेर निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी ऊत्तम राणे, चिटणीस नारायण सावंत, खजिनदार मोहन बागवे यांची तर संस्थेच्या कार्यकारी मंडळावर संतोष तांबे, प्रसाद बागवे, राजन बागवे, राजन लाकम, अनिकेत भोगले, विनायक वझे, शेखर बागवे, सौ राधीका श्रीकृष्ण परब, नंदा शिंगरे, संजय बागवे, भिमसेन बागवे, मधुकर बागवे, जे. डी. बागवे, प्रदीप भोगले, सुदाम परब, हेमंत परब, मनीष परब यांची निविड करण्यात आली आहे. यावेळी लोकल कमीटी अध्यक्ष महेश बागवे, अनिल बागवे, मोहन बागवे, रामकृष्ण बागवे, राजन बागवे, रामकृष्ण बागवे आदि उपस्थित होते.