वेंगुर्ले/ विवेक परब : शनिवार दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासुन साईदरबार हाॅल, सुंदरभाटले – वेंगुर्ले येथे भाजपाच्या वतीने मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे.
प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक नारायण सावंत यांच्या माध्यमातून ह्या मोफत कॅम्प चे आयोजन केले आहे. मोदी सरकार ने गोर गरीब जनतेसाठी विविध योजना आणल्या. गेल्या सात वर्षांत अंत्योदयाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले. लाखो गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले. ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात आले. गरीब कल्याण रोजगार अभियानात लाखो गरीबांना रोजगार देण्यात आला. तसेच पंतप्रधान जनधन योजना, अटल पेन्शन योजना , दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना, स्वामीत्व योजना, आत्मनिर्भर भारत योजना, स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमशक्ती पोर्टल, स्फूर्ती, पंतप्रधान कौशल विकास योजना, ई – स्कील इंडिया, पंतप्रधान युवा योजना, पंतप्रधान उजाला योजना, पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना ( सौभाग्य ) पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान आयुष्यमान योजना, पंतप्रधान जनऔषधी योजना अशा विविध योजना देशातील गोर गरीब जनतेसाठी आणल्या व त्यांचे जिवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले. ई -श्रम कार्ड खालील व्यक्तींना मिळु शकते— लहान व सीमांत शेतकरी, शेतमजुर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते , बांधकाम कामगार, दुध उत्पादक शेतकरी, लेदर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, रिक्षा चालक, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, प्लंबर, इलेक्ट्रीशन व इतर सर्व कामगार श्रमीक लेबर कार्ड काढु शकतात. तरी जास्तीत जास्त असंघटीत कामगारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी केले आहे.