बांदा / राकेश परब : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित येथील इंग्लिश मिडीयम प्रशालेत सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बावकर, प्रशाळेचे सल्लागार चंद्रशेखर नाडकर्णी, शाळेच्या सहशिक्षिका तब्बसुम आगा, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी वसावे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनपटातील अनेक प्रसंग आपल्या वक्तृत्वातून सर्वांसमोर सादर केले.
शाळेच्या सहशिक्षिका स्वाती वजरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सहशिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.