बांदा / राकेश परब : जनसेवा निधी बांदा या संस्थेने जाहिर केलेल्या पुरस्कारांचे रविवारी बांदा येथे वितरण करण्यात आले.जि.प. केंद्रशाळा बांदा च्या सभागृहात आयोजित केलेल्या सोहऴ्यात सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रविणकुमार ठाकरे यांच्या सत्कारमुर्तींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावर्षीचे जाहिर केलेले पुरस्कार पुढील प्रमाणे होते. आदर्श प्राथमिक शिक्षक अरविंद नारायण सरनोबत (जि.प.शाळा माडखोल नं.२) ,आदर्श माध्यमिक शिक्षक – सोमनाथ पंडित गोंधळी (सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज कुडासे), आदर्श समाजसेविका – वंदनाताई करंबेळकर (निरायम केंद्र ,कोलगांव), आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक – गुरुदास गोविंद कुसगांवकर (न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,कसाल),जीवन गौरव पुरस्कार – हेलन अँथोनी रॉड्रिक्स (व्ही. एन.नाबर इंग्लिश मिडियम स्कूल,बांदा) ,एस.एस.सी. बांदा केंद्र प्रथम – मराठी व इंग्रजी -अदिती संतोष देसाई ,विज्ञान – प्रकाश राजेश येडवे व तन्वी प्रशांत बांदेकर, गणित – तन्वी प्रशांत बांदेकर,एस.एस.सी.बांदा केंद्र प्रथम – एकता महादेव सावंत मोर्ये. अशी घोषित सत्कारमुर्ती तथा गुणवंत विद्यार्थ्यांची नावे होती.
कार्यक्रमाचे उद् घाटन डॉ.प्रविणकुमार ठाकरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. डॉ.मिलिंद खानोलकर यांनी कै.डॉ.द.भि.खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी डॉ.अरविंद खानोलकर, अपर्णा खानोलकर तसेच पुरस्कारप्राप्त सत्कार मुर्ती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे यांनी केले.डॉ.ठाकरे यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार प्रदान कऱण्यात आले. त्यानंतर सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीण भाषणात डॉ.प्रविणकुमार ठाकरे यांनी सांगितले की समाजाला घडवीण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. विद्यादान हे सामान्य नव्हे तर असामान्य कार्य आहे. सामाजिक कार्य करणारे बडेजाव व मोठेपणाचा हव्यास न धरता लहानात लहान सुक्ष्मत्वाची भावना मनात ठेऊन तळागाळापासून तसेच मनापासून कार्यरत राहतात.जनसेवा निधी ही संस्था निरपेक्ष समाजकार्य करणारी व सद् गुणी जनांचा गौरव करणारी असून अशा संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी ,मान्यवरांचे स्वागत डॉ.मिलिंद खानोलकर यांनी तर आभारप्रदर्शन अरुण देसाई यांनी केले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.