शिरगाव/संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी-चाफेड या मुख्य रस्त्यावरील साळशी-मिराशीवाडी,
देवणेवाडी, सरमळेवाडी व नाईकवाडी, घाडीवाडी यांच्या स्मशानकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन साळशीचे माजी ग्रा.पं. सदस्य जगन्नाथ मिराशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदरचे काम हे जनसुविधा योजनेंतर्गत घेण्यात आले असून त्यासाठी सुमारे ५ लाखाचा निधी मंजूर आहे.याप्रसंगी साळशी सरपंच वैभव साळसकर,उपसरपंच अनंत नाईक,भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, भाजपचे शिरगाव विभाग अध्यक्ष राजेंद्र शेट्ये,साळशी ग्रा.पं. सदस्य राकेश परब, माजी सरपंच किशोर साळसकर,माजी उपसरपंच राजेंद्र साटम, चाफेड चे माजी सरपंच संतोष साळसकर, चाफेड तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण राणे, शैलेंद्र जाधव , पोलीस पाटील सौ.कामिनी नाईक,शशिकांत पारधी,रमेश नाईक,गणेश मिराशी,विशाल पारधी,अनंत घाडी,आपा पारधी,गणेश पारधी,किरण नाईक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.