24.5 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

भगीरथ प्रतिष्ठान चे डाॅ. प्रसाद देवधर यांच्या मार्फत सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था , कसाल यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन प्रदान

- Advertisement -
- Advertisement -

आचरा/विवेक परब : भगीरथ प्रतिष्ठान , झाराप या संस्थेमार्फत डाॅ. प्रसाद देवधर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंव्यांगांसाठी काम करत असलेली संस्था ” सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ,कसाल ” यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्या संस्थेची अडचण दूर केली. गेली १२ वर्षे अनिल बापु शिंगाडे हे दिंव्यांग बांधवांना विविध शासकीय योजना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत . स्वतः दिंव्यांग असताना दिव्यांगासाठी करत असलेली धडपड तसेच त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कार्य लक्षात घेऊन भगीरथ प्रतिष्ठानने त्यांच्या संस्थेस संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे डाॅ. प्रसाद देवधर यांनी सांगितले . कसाल येथे सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर्लसचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत कोलते यांच्या हस्ते फीत कापुन संगणक संच व झेराॅक्स मशीन संस्थेस प्रदान करण्यात आला . यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर , जिल्हा संघटनसरचिटणीस प्रभाकर सावंत , डाॅ.प्रसाद देवधर , कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब , उद्योजक नवीन बांदेकर , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , संघाचे कार्याध्यक्ष लवु म्हाडेश्वर , सामाजिक कार्यकर्ते अवधुत मालणकर , दिव्यांग आघाडीचे जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , शासकीय सुविधा संयोजक प्रकाश वाघ तसेच संस्थेचे दिंव्यांग सभासद उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा/विवेक परब : भगीरथ प्रतिष्ठान , झाराप या संस्थेमार्फत डाॅ. प्रसाद देवधर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंव्यांगांसाठी काम करत असलेली संस्था " सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ,कसाल " यांना संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्या संस्थेची अडचण दूर केली. गेली १२ वर्षे अनिल बापु शिंगाडे हे दिंव्यांग बांधवांना विविध शासकीय योजना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत . स्वतः दिंव्यांग असताना दिव्यांगासाठी करत असलेली धडपड तसेच त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कार्य लक्षात घेऊन भगीरथ प्रतिष्ठानने त्यांच्या संस्थेस संगणक संच व झेराॅक्स मशीन देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे डाॅ. प्रसाद देवधर यांनी सांगितले . कसाल येथे सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर्लसचे अध्यक्ष डाॅ. प्रशांत कोलते यांच्या हस्ते फीत कापुन संगणक संच व झेराॅक्स मशीन संस्थेस प्रदान करण्यात आला . यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर , जिल्हा संघटनसरचिटणीस प्रभाकर सावंत , डाॅ.प्रसाद देवधर , कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब , उद्योजक नवीन बांदेकर , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , संघाचे कार्याध्यक्ष लवु म्हाडेश्वर , सामाजिक कार्यकर्ते अवधुत मालणकर , दिव्यांग आघाडीचे जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , शासकीय सुविधा संयोजक प्रकाश वाघ तसेच संस्थेचे दिंव्यांग सभासद उपस्थित होते .

error: Content is protected !!