मसुरे | झुंजार पेडणेकर : बोरिवली मुंबई येथील वृत्तपत्र वितरक निलेश नाईक व सहकाऱ्यांनी महाड तालुक्यातील गवळवाडी गोंडाळे ग्रामपंचायत येथील पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याच्या शंभर पॅकेटची मदत नुकतीच केली.मदत कार्यात नीलेश याना नरेश सुर्वे, राजा काळे, दिशांत चुरी यांनी सहकार्य केले. पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न सर्व सहकाऱ्यांच्या साथीने केल्याचे निलेश नाईक म्हणाले. बोरिवली येथील विविध सोसायटी मधील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करतानाच काही सोसायटींकडून ५ किलो गव्हाच पीठ, बिस्कीट चहा पावडर तसेच साड्या,लहानमुलाचे न वापरलेले कपडे असे बरेचे सामान दिल्याची माहिती निलेश नाईक यांनी दिली. तसेच सर्व दात्यांचे मदती बद्दल आभार मानले आहेत.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -