नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कणकवलीत दाखल
कणकवली / उमेश परब –
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कोम्रेड वेणू पी नायर हे कणकवली दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी त्यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या बुथवर मतदानाचा आढावा घेतला यावेळी सचिन सरगंले, संजय करिवले, संतोष बापट ,प्रशांत सावंत, संदीप संरगले ,कांबळे , तांबे, खामकर, वडवळकर, गुरव,सावंत, आदी कर्मचारी उपस्थित होते,
यावेळी नायर यांनी बोलताना सांगितले कि कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपली युनियन प्रामुख्याने लढत आहे तसेच प्रवाशांची सुरक्षितता व सेवेवेही आपण उपायोजना केल्या असल्याचे सांगत आमचा विजय निश्चितच असल्याचे नायर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले