26.9 C
Mālvan
Monday, June 23, 2025
IMG-20240531-WA0007

जनतेची काळजी असल्याचा ते आभास करत आहेत ; भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची आ. वैभव नाईक यांच्यावर टीका.

- Advertisement -
- Advertisement -

भविष्यातला ग्राउंड रिपोर्ट लक्षात आलाय म्हणून फडफड होत असल्याचेही केले प्रसिद्धी पत्राद्वारे भाष्य.

मालवण | प्रतिनिधी : भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या सध्याच्या सक्रीयतेवर प्रसिद्धी पत्राद्वारे टीका केली आहे. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणतात की, आ. वैभव नाईक यांना गेल्या १० वर्षात आश्वासनां पलीकडे काहीच करता आल नाही. पण आता जनता घरचा रस्ता दाखवणार हे लक्षात आल्यावर मात्र, आमदार वैभव नाईक हे, आपल्याला अनेक विषयांवर जनतेची काळजी आहे असा आभास निर्माण करुन कधी विधान भवनात तर कधी रस्त्यावर नौटंगी करताना दिसत आहेत. कधी अधिकाऱ्यांवर ओरडणे तर कधी आंदोलनाची भाषा करणे अशी ड्रामेबाजी ते करताना दिसत आहेत. सत्ता असताना जर वेळोवेळी लोकांच्या प्रश्नांवर मंत्रालयात जाऊन धोरणात्मक निर्णय घेतले असते आणि सत्तेचा वापर जनतेसाठी केला असता तर अशी नौटंगी करण्याची वेळ आली नसती असे भाष्य धोंडी चिंदरकर यांची केले आहे.

सिंधुदुर्गातील जनता आता समजून चुकली आहे की, जे सत्तेत असताना काही करु शकले नाहीं ते आता घरी बस्ताबस्ता काय विकास करणार असा टीकात्मक देखील सवाल धोंडी चिंदरकर यांनी केला आहे. आपल्या भविष्याचा ग्राउंड रिपोर्ट त्यांना लक्षात आला असून दिवा विझताना जशी फड फड वाढते तशी विधानसभा निवडणूक जवळ येइल तशी ती फड फड वाढत जाईल असेही धोंडी चिंदरकर यांनी म्हणत जनतेचा निर्णय पक्का, आमदार वैभव नाईक यांना धक्का’ असेही प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भविष्यातला ग्राउंड रिपोर्ट लक्षात आलाय म्हणून फडफड होत असल्याचेही केले प्रसिद्धी पत्राद्वारे भाष्य.

मालवण | प्रतिनिधी : भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या सध्याच्या सक्रीयतेवर प्रसिद्धी पत्राद्वारे टीका केली आहे. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणतात की, आ. वैभव नाईक यांना गेल्या १० वर्षात आश्वासनां पलीकडे काहीच करता आल नाही. पण आता जनता घरचा रस्ता दाखवणार हे लक्षात आल्यावर मात्र, आमदार वैभव नाईक हे, आपल्याला अनेक विषयांवर जनतेची काळजी आहे असा आभास निर्माण करुन कधी विधान भवनात तर कधी रस्त्यावर नौटंगी करताना दिसत आहेत. कधी अधिकाऱ्यांवर ओरडणे तर कधी आंदोलनाची भाषा करणे अशी ड्रामेबाजी ते करताना दिसत आहेत. सत्ता असताना जर वेळोवेळी लोकांच्या प्रश्नांवर मंत्रालयात जाऊन धोरणात्मक निर्णय घेतले असते आणि सत्तेचा वापर जनतेसाठी केला असता तर अशी नौटंगी करण्याची वेळ आली नसती असे भाष्य धोंडी चिंदरकर यांची केले आहे.

सिंधुदुर्गातील जनता आता समजून चुकली आहे की, जे सत्तेत असताना काही करु शकले नाहीं ते आता घरी बस्ताबस्ता काय विकास करणार असा टीकात्मक देखील सवाल धोंडी चिंदरकर यांनी केला आहे. आपल्या भविष्याचा ग्राउंड रिपोर्ट त्यांना लक्षात आला असून दिवा विझताना जशी फड फड वाढते तशी विधानसभा निवडणूक जवळ येइल तशी ती फड फड वाढत जाईल असेही धोंडी चिंदरकर यांनी म्हणत जनतेचा निर्णय पक्का, आमदार वैभव नाईक यांना धक्का' असेही प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

error: Content is protected !!