30.3 C
Mālvan
Thursday, May 8, 2025
IMG-20240531-WA0007

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान कर्मचाऱ्यांना दिवाळी प्रसाद वाटप.

- Advertisement -
- Advertisement -

अक्कलकोट | प्रतिनिधी : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीने एका महिन्याच्या वेतनाइतके बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) व मुंबई येथील स्वामी भक्त ॲड.मधुकर वैद्य व ईश्वरदास परदेसी, राजन पाटणकर, नूतन पाटणकर आदी सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व मधुकर वैद्य यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणारया सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस व आमच्या वतीने मिठाई वाटप करुन देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास व देवस्थान समितीस असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी मधुकर वैद्य व कुटूंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी या स्वामी प्रसाद व मिठाईचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ईश्वर परदेशी, प्रा.शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळणूरे, सचिन पेठकर, संदिप दुधनीकर, गिरीश पवार, संजय पवार, नरसप्पा मस्कले, श्रीशैल गवंडी इत्यादी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

अक्कलकोट | प्रतिनिधी : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीने एका महिन्याच्या वेतनाइतके बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) व मुंबई येथील स्वामी भक्त ॲड.मधुकर वैद्य व ईश्वरदास परदेसी, राजन पाटणकर, नूतन पाटणकर आदी सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व मधुकर वैद्य यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणारया सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस व आमच्या वतीने मिठाई वाटप करुन देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास व देवस्थान समितीस असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी मधुकर वैद्य व कुटूंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी या स्वामी प्रसाद व मिठाईचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ईश्वर परदेशी, प्रा.शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळणूरे, सचिन पेठकर, संदिप दुधनीकर, गिरीश पवार, संजय पवार, नरसप्पा मस्कले, श्रीशैल गवंडी इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!