23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

विरोधकांना निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा घेऊन प्रचार करण्याचा नैतिक अधिकार नाही.

- Advertisement -
- Advertisement -

धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण संदर्भात विरोधकांनी विधान भवनात आरक्षण बाजूने आवाज उठवला नाही आणि मतांच्या राजकारणासाठी आरक्षणाचा वापर करू नये भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी विरोधकांना ठणकावले.

सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : धनगर, ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन विरोधक भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करीत आहेत. ज्यावेळी धनगर समाज, मराठा समाज ओबीसी समाज आरक्षणासाठी आंदोलन उभे करत होता त्यावेळी विरोधकांमधील एकही नेता त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही किंवा विधानभवनात या समाजाच्या आरक्षण मिळावे या बाबत कोणतीही भूमिका मांडल्या नाहीत. त्यामुळे विरोधकांची ही आरक्षणाबाबतची दुटप्पी भूमिका समाजासमोर आलेली आहे. विरोधकांकडे प्रचारासाठी विकासाचा कोणताही मुद्दा नाही विविध लोकांकडे मतदार संघात विकास करण्यासारखे कोणते उद्दिष्ट नाही त्यामुळे ते भारतीय जनता पार्टी व महायुतीची बदनामी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत आहेत अशा विरोधकांना मी या प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगू इच्छितो की तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्यावर ती मतदान मागायचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे खोटा प्रचार करून मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये.तसे केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा काळे यांनी विरोधकांना दिला आहे.

ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाईल उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात केलेले काम व यापुढे करणार असलेल्या कामांचा आढावा घेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे नवलराज काळे यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे जनतेला ठाऊक. महाविकास आघाडीची सत्ता असताना ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळे तुमची सत्ता असताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागला होता तेच ओबीसींचे राजकीय आरक्षण महायुतीचे सरकार आल्यानंतर चालू झाले आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित झाल्या. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात कोण आहे ते जनतेला कळले आरक्षणाच्या विरोधात देशाच्या बाहेर जाऊन महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेसचे नेते खासदार तथा भारत सरकार विरुद्ध पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे आरक्षण कोण संपवतोय कोण संपू पाहतय जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांनी आरक्षणावरती न बोललेलंच बरं. जनता सुज्ञ आहे समाज सुशिक्षित आहे जनतेला सर्व ठाऊक आहे त्यामुळे नको ती केविलवाणे प्रयत्न करून निवडणुकीचा प्रचार विरोधकांनी करू नये असा सल्ला नवलराज काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे विरोधकांना दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागेवर महायुतीचा विजय निश्चित आहे महायुतीच्या माध्यमातून भटके विमुक्तांना, ओबीसींना न्याय देण्याचे काम राज्य सरकार केंद्र सरकार केले आहे व यापुढेही करतील असा आम्हाला विश्वास आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तांडा वस्ती सुधार योजनेतून बराचसा निधी जिल्ह्यात आला आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा अंमलबजावणी करण्याकरिता पाठपुरावा करणार. भटक्या विमुक्तांना चार वर्षांमध्ये पाच लाख घरे देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात झाले आहे. अनेक ठिकाणी महामंडळे स्थापन करून भटके विमुक्तांना न्याय देण्याचे काम भाजपनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे, राजे उमाजी नाईक महामंडळ, गोसावी महामंडळ, महामंडळ सारखे मंडळाच्या माध्यमातून भटके विमुक्तांचा विकास करण्याच्या बाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहिणी योजना, केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजना या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ मिळाला आहे. जलजीवन मिशन सारख्या योजनेतून वाडी वस्ती वरती पाणी पोहोचले आहे याचे सर्व श्रेय महायुतीच्या नेत्यांना जातं त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागा महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून येतील असा विश्वास देखील जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी श्री नवलराज काळे यांनी व्यक्त केला आहे. वैयक्तिक उमेदवार म्हणून आमदार नितेश राणे यांचे काम उत्तम आहे जिल्ह्यातील धनगर वस्त्या भटके विमुक्त समाजाला न्याय देण्याचं काम आमदार नितेश राणे यांच्याकडून झाले आहे त्यामुळे या कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण भटके विमुक्त समाज आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी राहिल. कुडाळ मालवण मधून निलेश राणे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील तसेच महायुतीचे उमेदवार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांचा देखील विजय निश्चित आहे.

तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीचा उमेदवारांचा प्रचार जोमाने करावा असे आवाहन देखील भटके विमुक्त आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!