मुंबई | प्रतिनिधी : मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच मुंबईत काॅनबॅकचे बांबू उद्योग व शेती अभ्यास मार्गदर्शक श्री संजीव करपे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे ओएसडी श्री. गिरीश बिबावे, सामाजिक अभ्यासक भरत दवे यां मान्यवरांची मुंबई प्रेस क्लब येथे भेट घेतली आणि कोकणच्या सर्वांगिण विकासावर चर्चा करण्यात आली.
या भेटीत श्रीकांत सावंत यांनी कोकणातील कृषी, उद्योजकता, रोजगार संधी या विषयांवर मान्यवरांशी चर्चा केली. कोकणातील सर्वांगीण विकासा दळणवळणाच्या माध्यमांचा विकास तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम, कोकणातील बंदरे विकास, कृषी, मराठीतून वैद्यकीय शिक्षण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कोकणची सुसंघटीत सामाजिक इच्छाशक्ती ही सक्षम करणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी मानवता विकास परीषदेचे राष्ट्रीय स्तरावरील उद्देश यावेळी मान्यवरांनी जाणून घेतले.
या संदर्भात मानवता विकास परीषदेसोबत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मान्यवर मंडळी नेहमीच दिशादर्शन करतील असे श्रीकांत सावंत यांनी माध्यमांना सांगितले आहे.