मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गवळीवाडी, श्रावण येथील सुनंदा बाळू चव्हाण यांचे आज ७ ऑक्टोबरला पहाटे १:१५ च्या दरम्यान कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयामध्ये वार्धक्याने निधन झाले. दातृत्ववान महिला व शांतताप्रीय व्यक्तिमत्व म्हणून त्या परिचीत होत्या. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
दिवंगत सुनंदा बाळू चव्हाण यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडं, पणतवंडं असा परिवार आहे. पत्रकार गणेश चव्हाण व सलून व्यावसायिक हरेश चव्हाण यांच्या त्या आई होत. जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा, पळसंब यांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.