25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

देवबाग ग्रामपंचायतचे शिंदे सेनेचे सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश.

ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील शिंदे सेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा. सदस्य रुपाली मोंडकर, प्रतिक्षा चोपडेकर, दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन श्री. रमेश कादरेकर यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. प्रवेशकर्त्यांचं आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षात त्यांच स्वागत केले आहे. शिंदे गटातील स्थानिक उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपच्या आयात उमेदवाराला संधी दिल्याने नाराज होत व आमदार वैभव नाईक यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे.

यावेळी बोलताना देवबाग सरपंच उल्हास तांडेल म्हणाले की आपण कुठल्याही पैशाचे आमीष न ठेवता केवळ आणि केवळ आमदार वैभव नाईक यांच्या विकास कार्यप्रणालीला प्रेरित होऊन आपण पक्षप्रवेश केला आहे. मालवण तालुक्यात शिंदे गटाच्या ताब्यात देवबाग ही एकच ग्रामपंचायत होती तरी देखील सातत्याने पक्ष नेतृत्वाने गळचेपी केली आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले नाही. कुडाळ मालवणची जागाही शिंदे गटाच्या वाट्याला येऊन देखील त्या ठिकाणी भाजपच्या आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळेच आपण नाराज होऊन आपण आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांनी देवबाग मध्ये केलेली विकास कामे धुपप्रतिबंधक बंधारे, नळ पाणी योजना, भूमिगत विद्युत वीजवाहिन्या, बीएसएनएल टॉवर, तौक्तेवादळात दिलेली भरीव नुकसान भरपाई, पारंपारिक मच्छीमारांचे प्रश्न सातत्याने मांडुन त्यांना न्याय मिळवून देवुन त्यांनी कोट्यावधी रुपयांची कामे देवबाग मध्ये केली आहेत. आ.वैभव नाईक यांच्या पाठीशी राहून त्यांना देवबाग मधून येणाऱ्या निवडणुकीत मी आणि माझे सहकारी मोठ्या मताधिक्य देण्याचा निर्धार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी परशुराम उपरकर देखील बोलताना म्हणाले की देवबाग वासियांनी राणेंच्या भ्रष्टाचाराचा पैसा न घेता भ्रष्टाचाराचे साथी न बनता स्वाभिमानी सरपंच श्री. तांडेल यांच्या पाठीशी उभे राहून आ. वैभव नाईक यांची मशाल ही निशाणी निवडून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे पुढे बोलताना म्हणाले की राणे कुटुंबाने स्वतःच्या स्वार्थासाठी दत्ता सामंत यांच्याशी जवळीक केली आहे पण त्यांनी इतक्या वर्षात कधीही दत्ता सामंत यांना आमदार केले नाही. राणे हे फक्त मी आणि माझी दोन मुलं त्याच्या पलीकडे त्यांना कार्यकर्त्यांशी काही देणं घेणं नाही आहे.आपण बाळासाहेबांच्या आदेशानुसार चेंबूर मधल्या दगडाला आमदार म्हणून निवडून आणले मात्र याच दगडाने लालसे पोटी बाळासाहेबांशी गद्दारी करून अनेक वेळा पक्षबदल केले आहेत. याच राणेंनी कोरोना काळात आपले हॉस्पिटल चालावे म्हणून महात्मा फुले योजना बंद करून गरिबांना मोफत उपचार न देता त्यांच्या माथ्यावर लाखो रूपयांची बीले मारून त्यांना कर्जबाजारी बनवले.राणे उद्योगमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्ग मधील एकही युवकाला कर्ज,नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून दिले नाहीत मात्र याच वेळी आपल्या प्रहारच्या बिल्डिंग मधील दोन मजले क्वायर बोर्डला भाड्याने देऊन त्याचे भाडे घेवून लाखो रूपये लाटले आणि स्वतः लाभार्थी झाले. मात्र आमदार वैभव नाईक यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच तौक्ते वादळात देवबागवासीयांच्या पाठीशी राहून भरीव काम केले आहे. आ. वैभव नाईक यांनीच नारायण राणे यांचा दहशतवाद मोडून काढत २०१४ साली त्यांना धूळ चारून या भागाचा विकास केला आहे. येणाऱ्या काळात आपण तिसऱ्यांदा त्यांना विधानसभेत निवडून देऊन आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री करूया असे उपरकर ठामपणे म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील सरपंच,उपसरपंच,ग्रा. सदस्य व कार्यकर्त्यांनी दाखवला त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांचे मनापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत करतो मी व माझे सहकारी त्यांचा मानसन्मान या पुढील काळात देखील राखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, खरंतर उल्हास तांडेल हे तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत सत्ता असली आणि सत्ता नसली तरी ते लोकांचे प्रश्न सोडवतात म्हणूनच ते एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत उल्हास तांडेल यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही केलेला विकास पाहून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. यापुढील काळात देखील आपण देवबाग चा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे म्हणत ते पुढे म्हणाले की देवबागसह कोकणात तौक्ते वादळाने होत्याच नव्हत करून लोकांचे जनजीवन विस्कळीत केले होते तेव्हा राणे कुटुंब कुठेही दिसले नाही मात्र आपण येथील जनतेच्या खंबीरपणे पाठीशी राहून भरीव मदत करून तौक्तेग्रस्तांना ६५ कोटीचे पॅकेज मिळवून दिले. त्याचप्रमाणे आपण येथील हॉटेल व्यवसायिकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहुन त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू दिली नाही. देवबाग मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता तो देखील आपण नगरपालिकेतुन देवबाग साठी नळपाणी योजना मंजूर करून आणुन सोडवला आहे भूमिगत वीज वाहिन्या, धुपप्रतिबंधक बंधारे अशी कोट्यावधी रूपयांची अनेक विकास कामे आपण केली असून या पुढील काळात देखील आपण देवबागला देशाच्या नकाशावर ठेवूनच काम करणार असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच तात्या बिलये, ग्रामपंचायत सदस्य रूपा मोंडकर, दत्तात्रय केळुसकर, प्रतीक्षा चोपडेकर,नाना तांडेल, एन्जॉय तुळसकर, रुपेश लोंढे, उत्तम केळुस्कर, शेखर कांदळगावकर, गणेश सातोसकर, कीर्तिवान केळुसकर, दशरथ राऊळ, हेमंत राऊळ, संजय सावंत, नितेश केळुसकर, विशाल केळुसकर, पार्थ राऊत, कुशाल साळगावकर, संतोष राणे, राजू कुबल, केशव खोबरेकर, पायाजी साळगावकर, किशोर राऊळ, हेमंत राणे,हेमंत साळगावकर, वैष्णव केळुसकर, रोहित रोगे, परशुराम राऊळ, मंगेश खोबरेकर, मुकुंद कोळंबकर, सदाशिव राऊळ या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, काँग्रेस तालुका प्रमुख जेम्स फर्नांडिस, शहरप्रमुख बाबी जोगी आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!