मालवणचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या कार्यकाल वर्षपूर्तीनिमित्त मातृत्व आधार फाऊंडेशन पदाधिकारी व सदस्य यांनी दिल्या शुभेच्छा.
मायमाऊली महिला सबलीकरण संस्था अध्यक्ष फॅनी फर्नांडिस व सदस्य यांचीही उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मालवण पोलिस स्टेशनच्या कार्यकालाची नुकतीच ३० जून रोजी वर्षपूर्ती झाली. या निमित्ताने मातृत्व आधार मंडळ अध्यक्ष श्री. संतोष लुडबे तसेच दादा वेंगुर्लेकर व पदाधिकारी आणि सदस्यांनी, मालवण पोलिस स्टेशन येथे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगांवकर, योगेश मंडलीक, मनोज खोबरेकर, संतोष सकपाळ, मार्शल फर्नांडिस, सुजीत मोंडकर, बाळा तारी आणि माय माऊली महिला सबलीकरण संस्था अध्यक्ष फॅनी फर्नांडिस, भारती वाईरकर, ममता तळगांवकर, दिक्षा लुडबे उपस्थित होत्या.

श्री प्रवीण कोल्हे. ( प्रभारी – पोलिस निरीक्षक, मालवण.)
यावेळी मातृत्व आधार मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष लुडबे यांनी प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मालवण मधील कार्यकालात त्यांनी प्रोत्साहन दिलेल्या व सहकार्य केलेल्या सामाजिक कामांबद्दल त्यांची प्रशंसा करत कृतज्ञता व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व मातृत्व आधार फाऊंडेशनच्या सदस्यांनी मालवणच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य विषयक, मातृत्व आधार फाऊंडेशन सदस्य देत असलेल्या एकत्रित योगदानाचा आढावा घेतला.

प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मालवणचे नागरीक व संकटकाळी मातृत्व आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून, गरजुंना सहकार्य करत वाटचाल करणारी जीवनपद्धती आपल्याला भावली असे सांगितले. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी शुभेच्छांचा स्विकार केला आणि सांगितले की मातृत्व आधार फाऊंडेशन फाऊंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी सहकार्य केले जाईल.