देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर यांनी केला आ. वैभव नाईक यांचा स्वागत सत्कार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार कार्यक्रमाला भेट देऊन, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी श्री. देव रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री हरीश गांवकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला.

यावेळी आमदार वैभव नाईक, देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक किरण आपटे, युवा सेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण,यशवंत गांवकर, मनोज मोंडकर, किशोर गांवकर, जयदेव लोणे, नितीन राऊळ, दत्ता पोईपकर युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा खोत, महिला आघाडीच्या दीपा शिंदे, नीना मुंबरकर, सोनाली डिचोलकर, निनाक्षी शिंदे मेथर तसेच दादा गांवकर, आपा गांवकर, संजय लुडबे, सिताकांत गांवकर, रमेश गांवकर, कमलाकर गांवकर, जगदिश गांवकर, आनंद गांवकर, महेश लुडबे, तसेच देवस्थान विश्वस्त गांवकर मानकरी, मंदिर पुजारी श्री. भूषण राऊळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.