पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांची संकल्पना
पत्नीचेही नांव आता घराच्या असेसमेंटमध्ये येणार…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पंचायत समिती दारी या अभिनव अशा उपक्रमातून आज आम्ही सर्वजण तुमच्या समोर आलो आहोत. मसुरे पंचायत समिती गणातील विविध विकासात्मक जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडविले जातील. या मध्ये काही त्रुटी असतील त्या दूर करून या भागातील सर्व विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. तसेच येथील सर्व सरपंच व सर्व सदस्य सर्व प्रशासकीय यंत्रणा यांना सोबत घेऊन येत्या ३१ मार्चपूर्वी सर्व स्तरावरती विकासात्मक प्रश्न सोडविले जातील. सर्व अधिकारी वर्गाने ही तन मन धन अर्पून काम करावे असे प्रतिपादन सभापती अजिंक्य पाताडे यांनी येथे केले.
पंचायत समिती आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आढावा सभा मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मसुरे मर्डे ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सर्व खात्यांच्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी वर्गाला 31 मार्चपूर्वी प्रलंबित निधी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना केल्यात. तसेच उपस्थित ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अशा स्वयंसेविका, शिक्षक वर्ग, व प्रशासकीय कर्मचारी यांना विकासात्मक कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या. हे प्रश्न सोडवताना जर काही अडचणी आल्यात तर त्या आपण पंचायत समितीच्या मार्फत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पंचायत समिती मालवण अंतर्गत सन २०२०/२०२१ मधील योजना व विकास कामे वेळीच होण्याच्या दृष्टीने पंचायत समिती आपल्या दारी हा उपक्रम सभापती अजिंक्य पाताडे यांच्या संकल्पनेतून मालवण तालुक्यात सर्वत्र घेण्यात येत आहे. यातून विविध कामांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचे अजिंक्य पाताडे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत कर वसुली व पाणीपट्टी आढावा, जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत आढावा, स्वच्छ भारत मिशन संबंधी आढावा, तसेच इतर अनुषंगिक विषयांचा आढावा, जीपी डीपी अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा, १४ व १५ वा वित्त आयोग जमा खर्चाचा आढावा, डीपी डीपी/ बीपीडीपी अंतर्गत १५ वित्त आयोग जिल्हास्तर तालुकास्तर कामाचा आढावा, सन २०२०-२१ मधील मंजूर जनसुविधा, नागरी सुविधा, तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम क वर्ग, पंचवीस पंधरा लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे, ग्रामपंचायतीने मक्त्यानी घेतलेली कामे, शाळा दुरुस्ती, रस्ते कामाचे प्रलंबित प्रस्ताव व मंजूर कामाचे सद्यस्थिती बाबत आढावा, लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील कामाचा आढावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामांतर्गत शोषखड्डे, बांबू व फळझाड लागवड प्रस्ताव व रस्ते, अपूर्ण कामाचा आढावा, अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे, जिल्हा परिषद सेस कामे व समाज कल्याण विभागाकडून योजना आढावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रस्ताव ऑनलाइन करणे आढावा, बायोगॅस प्रस्ताव व कामांचा आढावा, पी एम ए वाय घरकुल अपूर्ण कामे व प्रस्ताव आढावा, एम एस आर एल एम अंतर्गत येणाऱ्या विषयांवर चर्चा व इतर सर्व खात्यांच्या अडचणीबाबत यावेळी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान मालवण पंचायत समितीने प्रत्येक गणवांर विविध कलाक्षेत्रातील कलाकारांना आणि पारंपारिक कलेला पुढे आणण्यासाठी एका कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील सर्व पारंपारिक कलांना न्याय देण्याचाही प्रयत्न करणार येणार आहे. सरी सर्व अबाल वृद्ध महिला कलाकारांनी आपल्या पारंपारिक कला जतन करण्यासाठी या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे ही आवाहन सभापती अजिंक्य पाताडे यांनी यावेळी केले. यावेळी मसुरे पंचायत समिती सदस्य सौ गायत्री ठाकूर, मर्डे सरपंच संदीप हडकर, महिला बाल कल्याणच्या के ए रसाळ पराडकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी एस बी माने, आर डी कांबळी, सार्वजनिक बांधकाम चे प्रकाश कात्रे, आरोग्य अधिकारी सुरज बांगर, श्री मीठागरी, जलजीवन चे अधिकारी अतुल माने, ग्राम विकास अधिकारी शंकर कळसुलकर, मसुरे तलाठी श्री गिरप, महान सरपंच सीताबाई महानकर, मालडी सरपंच वैशाली घाडीगावकर, देऊळवाडा सरपंच आदिती मेस्त्री, व ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, ग्रामसेवक श्री देसाई, ग्रामसेवक भगवान जाधव, ग्रामसेवक एस आर प्रभूदेसाई, बीळवस सरपंच मानसी पालव, राघवेंद्र मुळीक, मसुरे केंद्र शाळा मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, पोलीस पाटील प्रेरणा येसजी, सोनल भोगले, रिया आंगणे, संजना मसुरकर भाग्यश्री रेडकर, सरिता परब आणि अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, मंडल अधिकारी ,तलाठी, कृषी अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आदी विविध खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका शिक्षक वर्गातून विविध प्रश्नांबाबत महत्वपूर्ण चर्चा विनिमय केल्यात. या सर्वांना गटविकास अधिकारी श्री जाधव, सभापती अजिंक्य पाताडे यांनी उत्तरे दिली.
ग्रामपंचायत मध्ये घराच्या असेसमेंट मध्ये पतीच्या नावासोबत पत्नीचे नाव दाखल करणे गरजेचे असून प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी यांनी पतीच्या नावाबरोबर पत्नीचे नाव असेसमेंट मध्ये लवकरात लवकर दाखल करून घ्यावीत. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश गटविकास अधिकारी श्रीयुत जाधव यांनी उपस्थित सरपंच ग्रामसेवकांना दिले आहेत. पत्नीचे नाव दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायतीची तक्रार पंचायत समिती स्तरावर ती करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सूत्रसंचालन आभार पी डी जाधव यांनी केले..