आचरा मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील कारवाई.
चिंदर | विवेक परब : दोन ब्रास इतकी अवैध माती वाहून नेणार्या एका वाहनावर आचरा वायंगणी येथे कारवाई करण्यात आली आहे.
आचरा मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत माती वाहतूक करणार्या एका वाहनाला ,2 ब्रास एवढी अनधिकृत वाहतूक करताना वायंगणी नाका येथे तलाठी व्ही व्ही कंठाळे, पोलीस पाटील वायंगणी सुनील त्रिंबककर,पोलीस कॉन्सटेबल पुजारे आदी अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाई केली आहे. आगामी दंडात्मक कारवाईसाठीचा प्रस्ताव तहसील कार्यालय मालवण यांच्याकडे पाठवला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सदर वाहन पोलीस स्टेशन आचरा येथे जमा केले गेले आहे.