संत रविदास भवन समितीचे प्रमुख श्री.श्रीराम चव्हाण यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन व एकजुटीचे आवाहन .
जिल्हाध्यक्ष श्री सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस श्री.चंद्रसेन पाताडेंची विशेष उपस्थिती.
पोईप | ओंकार चव्हाण :सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित मालवण तालुका शाखेच्या नांदोस येथील सभेत रविदास भवन समितीचे प्रमुख श्रीराम चव्हाण यांनी उपस्थित समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की,संत रविदासांची जशी पवित्र व सर्वसमावेशक विचारधारा होती तशीच त्यांच्या नावाची वास्तूही आपण सर्व मिळून सर्वांगीण सामाजीक गुणवत्तेची व दिमाखदार बनवूया.समाजाला या वास्तू निर्मितीतून नवी उभारी निश्चित मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी तालुका पदाधिकारी यांनी प्रभागनिहाय बैठक घेऊन 31 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी भवन कामाच्या संदर्भात सर्व माहिती सभेत दिली.तसेच भवनाचे स्वप्न साकार होत असताना सर्वानी आपले बहुमोल योगदान द्यावे असे आवाहन केले.जिल्हा सदस्य वसंत चव्हाण गुरुजी यांनी भवन कामाला सर्वतोपरी सहकार्य करा असे आवाहन केले.यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल पाताडे,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव चव्हाण,कायदेशीर सल्लागार हृदयनाथ चव्हाण,प्रसिद्धिप्रमुख मंगेश आरेकर,तालुका सचिव अमित चव्हाण,सहसचिव काशिनाथ पाताडे,समिती कार्यवाह बाळकृष्ण नांदोसकर, माजी तालुका सचिव मनोहर मालंडकर,रामचंद्र चव्हाण,सदस्य विजय पाताडे,सिद्धार्थ पाताडे आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव अमित चव्हाण यांनी केले.