24.5 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

पोईप वि.का.स. संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत ‘पोईप गांव विकास पॅनेलची’ सत्ता विजयाची दिवाळी….!

- Advertisement -
- Advertisement -

सतरा वर्षे सत्तेत असलेल्या पॅनेलचा झाला सणसणीत पराभव…!

पोईप | ओंकार चव्हाण : सन 2021 – 22 ते 2026 – 27 या पंचवार्षिक कालावधीकरिता नुकत्याच झालेल्या मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पोईप विकास संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनेलला धूळ चारून सत्ता प्रस्थापित केली आहे. या संस्थेच्या एकूण १३ उमेदवारांपैकी ०४ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामध्ये शिवसेना पुरस्कृत पंकज वर्दम, मधू कोकरे, रेश्मा पोईपकर, तर ग्रामविकास पॅनल च्या शीतल भाट यांचा समावेश आहे. उर्वरित ०९ जागांसाठी दोन्ही पॅनलचे मिळून एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. संस्थेच्या ५३१ मतदारांपैकी २१७ मतदारांनी मतदान केले असून ना. मा. प्रवर्ग मधून उभे असलेले शिवसेना पुरस्कृत उमेदवार पुनेश सत्यवान जाधव यांनी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार सोमा रामचंद्र जाधव यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. तर सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातील दुरंगी लढतीत आठ पैकी आठही जागांवर शिवसेनेचे गाव विकास पॅनेलचे आठही उमेदवार संतोष हिवाळेकर, अरुण माधव, दिगंबर माधव, विठ्ठल नाईक, नारायण पालव, राजेंद्र पालव, भिवा पारकर, विलास सांडव यांनी प्रतिस्पर्धी यांचा दारुण पराभव करीत विजय संपादन केला आहे. यामुळे पोईप विकास संस्थेवर १३ पैकी एक उमेदवार वगळता १२ जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या १७ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून येथील सभासद शेतकऱ्यांनी आपणास अपेक्षित असा सत्ता बदल केला आहे. ज्यांच्या हातात आजवर सत्ता होती त्यांच्या सर्वच कारभारावर जनता नाराज व कंटाळलेली होती. त्याचाच उद्रेक होऊन मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.मात्र आमच्या या विजयाचे आणि यशाचे सारे श्रेय पोईप येथील शिवसेना कार्यकर्त्यांचे असून या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम व नियोजन पॅनल प्रमुख गोपीनाथ पालव, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष पंकज वर्दम, सत्यवान पालव, सुनील भाटकर, बाळा सांडव, विजय पालव, शिवरामपंत पालव, पांडुरंग चव्हाण यांनी घेतले असल्याचे माहिती देताना पालव यांनी स्पष्ट केले आहे.पोईप विकास संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी सत्ता परिवर्तन करून आमच्यावर टाकलेली जबाबदारी व विश्वास आम्ही निश्चितच पाच वर्षाच्या कारकिर्दीत सार्थकी लावून संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना विविध सेवा सुविधा देवून त्यांचा शेती व सर्वांगीण विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे पॅनल प्रमुख गोपीनाथ पालव यांनी सांगितले तर युवासेना जिल्हा उपाध्यक्ष पंकज वर्दम यांनी आपणास निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार व्यक्त करीत अभिनंदन केले आहे व कार्यसम्राट खास. विनायकजी राऊत साहेब आणि आम. वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून संस्थेचा व संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांचा विकास करण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.या निवडणुक कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनीता आशिष भोगले यांनी चांगल्या प्रकारे काम केले त्यांचे आभार व्यक्त करून नवनिर्वाचित सर्व संस्था संचालकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

     
ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सतरा वर्षे सत्तेत असलेल्या पॅनेलचा झाला सणसणीत पराभव...!

पोईप | ओंकार चव्हाण : सन 2021 - 22 ते 2026 - 27 या पंचवार्षिक कालावधीकरिता नुकत्याच झालेल्या मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पोईप विकास संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनेलला धूळ चारून सत्ता प्रस्थापित केली आहे. या संस्थेच्या एकूण १३ उमेदवारांपैकी ०४ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामध्ये शिवसेना पुरस्कृत पंकज वर्दम, मधू कोकरे, रेश्मा पोईपकर, तर ग्रामविकास पॅनल च्या शीतल भाट यांचा समावेश आहे. उर्वरित ०९ जागांसाठी दोन्ही पॅनलचे मिळून एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. संस्थेच्या ५३१ मतदारांपैकी २१७ मतदारांनी मतदान केले असून ना. मा. प्रवर्ग मधून उभे असलेले शिवसेना पुरस्कृत उमेदवार पुनेश सत्यवान जाधव यांनी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार सोमा रामचंद्र जाधव यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. तर सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातील दुरंगी लढतीत आठ पैकी आठही जागांवर शिवसेनेचे गाव विकास पॅनेलचे आठही उमेदवार संतोष हिवाळेकर, अरुण माधव, दिगंबर माधव, विठ्ठल नाईक, नारायण पालव, राजेंद्र पालव, भिवा पारकर, विलास सांडव यांनी प्रतिस्पर्धी यांचा दारुण पराभव करीत विजय संपादन केला आहे. यामुळे पोईप विकास संस्थेवर १३ पैकी एक उमेदवार वगळता १२ जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या १७ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून येथील सभासद शेतकऱ्यांनी आपणास अपेक्षित असा सत्ता बदल केला आहे. ज्यांच्या हातात आजवर सत्ता होती त्यांच्या सर्वच कारभारावर जनता नाराज व कंटाळलेली होती. त्याचाच उद्रेक होऊन मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.मात्र आमच्या या विजयाचे आणि यशाचे सारे श्रेय पोईप येथील शिवसेना कार्यकर्त्यांचे असून या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम व नियोजन पॅनल प्रमुख गोपीनाथ पालव, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष पंकज वर्दम, सत्यवान पालव, सुनील भाटकर, बाळा सांडव, विजय पालव, शिवरामपंत पालव, पांडुरंग चव्हाण यांनी घेतले असल्याचे माहिती देताना पालव यांनी स्पष्ट केले आहे.पोईप विकास संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी सत्ता परिवर्तन करून आमच्यावर टाकलेली जबाबदारी व विश्वास आम्ही निश्चितच पाच वर्षाच्या कारकिर्दीत सार्थकी लावून संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना विविध सेवा सुविधा देवून त्यांचा शेती व सर्वांगीण विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे पॅनल प्रमुख गोपीनाथ पालव यांनी सांगितले तर युवासेना जिल्हा उपाध्यक्ष पंकज वर्दम यांनी आपणास निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार व्यक्त करीत अभिनंदन केले आहे व कार्यसम्राट खास. विनायकजी राऊत साहेब आणि आम. वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून संस्थेचा व संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांचा विकास करण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.या निवडणुक कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनीता आशिष भोगले यांनी चांगल्या प्रकारे काम केले त्यांचे आभार व्यक्त करून नवनिर्वाचित सर्व संस्था संचालकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

     
error: Content is protected !!