माजी खासदार व भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या नेतृत्वाला दिले विजेत्यांनी श्रेय…..!
चिंदर | विवेक परब : मठबुद्रुक विकास संस्थेची पंचवार्षिक निवडणुक पार पडून त्याचे निकाल हाती आले आहेत. श्री. एस. एम. मयेकर, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली सुरळीत व शांततेत पार पडली होती.
सदर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून मालवण पंचायत समितीचे उपसभापती श्री. राजू परुळेकर यांचे पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत.या निवडणुकीसाठी मालवण पंचायत समिती उपाध्यक्ष श्री. राजु परुळेकर, अनंत राऊत आणि जनार्दन सावंत यांनी विशेष लक्ष घालून विजयासाठी मेहनत घेतली होती.
या निवडणुकीच्या निकालावेळी मालवण तालुका भाजपचे अध्यक्ष श्री.धोंडी चिंदरकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाचा व नेतृत्वाचा करीष्मा असल्याचे राजू परुळेकर व त्यांच्या इतर विजयी सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे कारण त्यांच्याविरुद्ध संपूर्ण महाविकास आघाडी होती. प्रचारासाठी वैभव नाईक, सतीश सावंत, विक्टर दांटस, विलास गावडे व इतरजण आघाडीची नेते मंडळी एकतर स्वतः प्रचारत होती..किंवा बैठकाही घेत होती.