जनतेचे मानले मनःपूर्वक व विशेष आभार
ब्युरो न्यूज | विवेक परब : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ठेवलेला विश्वास, शिवसैनिकांची अथक मेहनत आणि कुडाळ मालवणच्या जनतेच्या आशिर्वादाने सलग दोन वेळा आमदार म्हणून आपण निवडून आलो असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.आज त्यांच्या आमदारकीला ६ वर्षे पूर्ण झाली. आमदार झाल्यानंतर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वोतोपरी आपण प्रयत्न केले आहेत.विकासकामांना गती दिली व यापुढेही हे काम असेच अविरतपणे सुरू ठेवणार आहे असे ते म्हणाले. कुडाळ मालवणच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कुडाळ व मालवणच्या जनतेला शतशः व विशेष धन्यवाद दिले आहेत..