गेली सात वर्षे मालवणचे उपनगराध्यक्ष असून भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचा वराडकर यांचा स्पष्टोच्चार..!
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगराध्यक्ष श्री महेश कांदळगावकर यांनी पत्रकाद्वारे केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले आहे.
राजन वराडकर यांनी त्यांच्यावर लागणार्या अनेक निष्क्रियतेच्या आरोपांचे खंडन करत त्यांनी गेली सात वर्षे जनतेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांची आठवण नगराध्यक्षांना करुन दिली . भाजप व शिवसेना युतीने आपण निवडून आल्याने शिवसेना पक्षावर कधीच कुठला आरोप केलेला नसल्याचेही स्पष्टीकरण वराडकर यांनी दिले आहे .
स्वतः नगराध्यक्षांवर विविध आरोप असताना त्यांनी निर्भेळ कारकिर्द असलेल्या उपनगराध्यक्षांवर आरोप करु नयेच शिवाय आपण उपनगराध्यक्ष असल्याची जाणीव नेमकी न.पा.निवडणुकांना दोनच महिने शिल्लक असताना का झाली असाही सवाल उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी केला आहे.
उपनगराध्यक्ष असून न.पा.च्या किती ध्येयधोरणांबाबत नगराध्यक्षांनी आपल्याला विश्वासात चर्चा केली याचीही खातरजमा जरुर करावी असा टोला यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी लगावला.