संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विकास मंडळ, देवगडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त श्री. स. ह. केळकर महाविद्यालय आणि श्रीमती न. शां. पंतवालावलकर महाविद्यालय, देवगडच्या वतीने विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, ढोल पथक व चित्ररथांसह देवगड कॉलेज ते तहसील कार्यालयापर्यंत काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली.
दिंडीमध्ये ५० विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, २० विद्यार्थ्यांचे ढोल पथक आणि चित्ररथांचा समावेश होता. चित्ररथामध्ये महात्मा फुले, डॉ.आनंदीबाई जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम, मलाला युसूफजाई यांच्या व्यक्तिरेखा सादर करून समाजापर्यंत त्यांचे कार्य सादरीकरणाच्या माध्यमातून पोहोचविण्यात आले. तहसीलदार स्वाती देसाई, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, विवेक शेठ, पोलिस निरिक्षक नीळकंठ बगळे, पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण, महाविद्याल्याच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांभळे, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.