29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वैभव नाईक ज्याप्रमाणे शिवसेनेच्या पाठिशी उभे राहीले तसं आपणही भगव्याच्या पाठीमागे मशाल घेऊन उभे रहा.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालवणच्या प्रचार सभेत आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मालवणातील जाहीर सभेत महायुतीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी उभे रहात मशाल चिन्हाला मतदान करायचे आवाहन केले आहे. मालवणच्या टोपीवाला हायस्कूल मैदान वर संपन्न झालेल्या भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की लोकसभेत जे झालं ते झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र तसे होता कामा नये याची दक्षता घ्या नाहींतर आता तुम्ही चुकलात तर गुंडांचे राज्य येऊन तुम्हाला दोन्ही पोर खांद्यावर आणि बाप डोक्यावर घेऊन लाचार होऊन चालावं लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मंडळींवर टीका करताना सांगितले की ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या मातीची शपथ घेऊन वैभव नाईक ज्याप्रमाणे शिवसेनेच्या पाठीशी इमानाने उभा राहिला तसंच आपणही भगव्याच्या पाठीमागे, मशालीच्या पाठीमागे उभे राहा.

सभास्थळावर मालवणातील शिवसैनिकांच्यावतीने उद्धव ठाकरे यांना भव्य पुष्पमाला घालून आणि फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करून स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, मिलिंद नार्वेकर, भाई गोवेकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत, अमित सामंत, व्हीक्टर डांटस, इर्षाद शेख़, सतिश सावंत, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेवक यतीन खोत, महेंद्र म्हाडगुत, महेश जावकर, मनोज मोंडकर, नरेश हुले, मेघनाद धुरी, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशहरप्रमुख, उमेश मांजरेकर , मंदार ओरसकर, किरण वाळके, फारुख मुकादम, महेश अंधारी, सिद्धेश मांजरेकर, अनंत पाटकर, दत्तगुरु पोईपकर, करण खडपे, राहुल परब, अक्षय भोसले, नवनाथ झोरे, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे मेथर, पूनम चव्हाण, सेजल परब, सौ. शिल्पा यतीन खोत यांनी, आर्या गावकर, पूजा तोंडवळकर, नीना मुंबरकर, उमेश चव्हाण, राजेश गांवकर, मेघनाद धुरी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जाहीर सभेस तालुक्यातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महिला, युवक उपस्थित होते.

आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा झाली आता विधानसभे- साठी आलो आहे, लोकसभेत आपण थोडे कमी पडलो, त्यामुळे आपला पराभव झाला. कोकणातील पराभव हा माझ्या हृदयाला चटका लावून गेला, कारण कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण, हे नाते आजपर्यंत कोणी तोडू शकले नाही, आणि आताही कोणी तोडू शकणार नाही. ज्या ज्या वेळी कोकणावर संकट आले त्या त्यावेळी शिवसेना धावून आली, आणि ज्या ज्यावेळी शिवसेनेवर संकट येते तेव्हा कोकण ठाम उभा राहतो असे सांगत श्री ठाकरे म्हणाले, आज शिवसेना अडचणीत नाहीत्याच्यासाठी मी आज इथे आलो आहे म्हणून मला तुमची मदत पाहिजे, म्हणून मला तुमची साथ पाहिजे म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आज मोदी आणि शहा हे आपली शिवसेना संपवायला निघाले आहेत, आजपर्यंत असे घडले नव्हते. पक्ष फुटतात, काही माणसे इकडची तिकडे जातात, तिकडचे इकडे येतात हे राजकारणात ठीक आहे. परंतु शिवसेना संपविण्याचा नीचपणा एकेकाळचा मित्र आज करत आहे. जेव्हा महाराष्ट्रात भाजपा कुठेही नव्हती तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व, देश, महाराष्ट्र याच्यासाठी भाजपशी युती केली. परंतु आज हे लोक शिवसेनेला वापरून फेकून देत आहेत, अशा लोकांना आपण धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,श्री ठाकरे पुढे म्हणाले, कुणीतरी मला आव्हान दिले की रस्त्याने येऊन परत जाऊन दाखवा, त्यांना मी सांगू इच्छितो की, नशिबाने दिलंय ते घरी बसून नीट खा, मध्ये आलात तर वेडेवाकडे होऊन खाण्यात काही अर्थ नाही. आडवे आलात तर आडवे करू तेवढी ताकद आणि हिंमत या शिवसेनेमध्ये आहे असा इशारा देत ते म्हणाले, तुम्हाला कोकणचे वैभव हे वैभव नाईक यांच्या रूपाने जपायचे आहे की नाही ? की गुंडा पुंडांचे राज्य हवे असे असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी शहा आमच्यावर घराणेशाही, परिवार वाद असे जे कंठशोष करत होते, त्यांना आमचे सांगणे आहे की शिवसेना पक्ष माझ्या वडिलांनी निर्माण केला, शिवसेनाप्रमुखांनी मला शिवसेना दिली, शिवसैनिकांनी त्याला साथ दिली तर तुमचं काय जातंय, कोण आहात तुम्ही ? शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात? हिमालयात होतात की मिंधे पर्वतात होता ? अशी उपहासात्मक टीका करून उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई मध्ये शिवसेनेचा जो जन्म झाला तो मराठी माणसाच्या हक्कासाठी झाला, आणि शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेनेचे नेतृत्व शिवसैनिकांनी माझ्या हातात दिले असेल तर तुम्ही चोंबडेपणा करणारे कोण असा सवालही ठाकरे यांनी केला. हा सवाल विचारतानाच ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही तुम्हाला चालत नाही, मात्र इकडे जे काही चालू आहे ते चालते ? बाप डोक्यावर आणि दोन खांद्यावर दोन पोरं हे तुम्हाला चालते. तुम्हाला हिंदुत्व मानणारी, तुम्हाला संकटात साथ देणारी शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. आमच्यावर टीका करताना तुम्ही म्हणता काँग्रेस यांच्या बरोबर आहे. होय ! … काँग्रेस आमच्याबरोबर आहे, राष्ट्रवादीही आमच्याबरोबर आहे, आम्हाला तुमची हुकूमशाही नको, ही हुकूमशाही गाडण्यासाठीच आम्ही आणि इतर पक्ष एकत्र आलो आहोत. आम्हाला हुकूमशाही नको, आम्हाला शिवशाही पाहिजे म्हणून एकत्र आलो. आम्ही काँग्रेस सोबत गेलो तर लगेच यांनी आम्ही हिंदुत्व सोडल्याची बोंब ठोकण्यास सुरुवात केली. परंतु काश्मीर मधील ३७० वे कलम काढताना आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. तुमचे कौतुक केले. ३७० हे काश्मीरसाठी देशासाठी महत्वाचे आहेच. कारण काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य भाग आहे, हे आम्हाला मान्यच आहे. परंतु कोकणात येऊन ३७० कलमचे काय सांगता. जेव्हा काश्मीर पंडितांवर अन्याय अत्याचार होत होता, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रात घरे दिली, त्यांच्या पोरा बाळांना शिक्षण दिले. तेव्हा ना गुजरात बोलवत होता, ना दुसरे राज्य बोलवत होते, ना भाजप बोलवत होते. असा टोलाही त्यांनी हाणला.

ते पुढे म्हणाले, शिवसेना संपवायला निघालात . तुम्हाला शिवसेना संपवायचे असेल तर समोर येऊन लढा तुम्ही मर्द असाल तर बाकीच्या यंत्रणा न घेता तुम्ही समोर या. परंतु तुम्ही ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांचा वापर करता, म्हणजेच तुम्ही मर्द नाही तर तुम्ही नामर्द आहात, म्हणून त्यांचा वापर करताय. तुम्ही सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग करताय. जुन्या केसेस उकरून काढताय, माझ्या लोकांना धमक्या देताय, पैसे देताय, तो उकरून काढताय, माझ्या लोकांना धमक्या देताय, पैसे देताय, तो सुद्धा जनतेचा पैसा देताय. अशा नामर्दाशी आम्हाला लढावं लागतंय हे दुर्दैव आहे, असेही ठाकरे म्हणाले.

मी तुमच्या दरबारात हक्काने न्याय मागायला आलोय आशीर्वाद मागायला आलो आहे आणि तो तुम्ही द्याल असा मला विश्वास आहे हा वैभव म्हणजे वैभव नाईक नाही तर मी उभा आहे पलीकडे राजन तेली उभा आहे तो राजन नाही तर मी उभा आहे त्याच्या पलीकडे संदेश उभा आहे तो संदेश पारकर नाही तर मी उभा आहे अशा पद्धतीचे वक्तव्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना केलं तुम्ही जे मत देणार आहात ते तुमच्या भविष्याला देणार आहात आणि म्हणूनच कोकणचे वैभव जपायचे असेल तर भगव्या शिवाय आणि मशालीशिवाय पर्याय नाही.

ठाकरे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणीतील पुतळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तो पैसे खाऊन केला आहे, मोदी हे शिवभक्त नाही, ऊन वारा पाऊस, लाटा सहन करून सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे मात्र दाढीवाले मिंधे हा पुतळा वाऱ्याने पडला म्हणताहेत. हा खाली मुंडी पातळ धुंडी म्हणतोय, वाईटातून चांगलं होतं असं म्हणणाऱ्या केसरकर यांचा पराभव झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चांगलं होणार असे ठाकरे म्हणाले.यावेळी विनायक राऊत, परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, अमित सामंत, हरी खोबरेकर, शिल्पा यतीन खोत यांची भाषणे झाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!