पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळलण डिकवल येथे गेल्या आठ दिवसात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने गुरांचा मृत्यू झाला आहे. गुरे दगावल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डिकवल तेलीवाडी येथील शेतकरी सुभाष पांडुरंग तेली यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची गुरे शेपटी रोगाने दगावली. गेल्या आठ दिवसांत या परिसरात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने येथील गुरांना प्रादुर्भाव झाला आहे. या आजाराने गुरे निष्क्रिय होऊन गुरांची प्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी आठ दिवसांत कोणत्याही गावठी व वैद्यकीय उपचाराला गुरे प्रतिसाद देत नसल्याने गुरे मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे शासनाकडून संबंधित क्षेत्राचा सर्व्हे करून गुरांना लसीकरण करावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. तसेच मृत गुरांच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -