आभाळमाया ग्रूपचे आयोजन.
चौके | अमोल गोसावी :
मालवण तालुक्यातील कट्टा येथे आभाळमाया ग्रूप आणि कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी “सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम” यांच्या पुण्यतीथीनिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात वराड गावात “आभाळमाया” ग्रुपने सुरू केलेली रक्तदानाची चळवळ आता कट्टा पंचक्रोशीच्या बाहेर मालवण तालुक्यात पसरली आहे. “आभाळमाया” ग्रुपने मागील वर्षी २२१ रक्तदात्यांचे रेकॉर्डब्रेक “रक्तदान शिबिर”घेऊन एक आदर्श प्रस्थापित केला आणि तरुण वर्गाला जास्तीतजास्त “रक्तदान कार्यात”सक्रिय करून घेतले. तसेच वर्षभर रुग्णाच्या गरजेवेळी जिल्ह्यात, मुंबई आणि गोवा राज्यात आभाळमाया ग्रूपच्या सदस्यांनी लाईव्ह रक्तदान केलेले आहे.
यावर्षीचे रक्तदान शिबीरही रेकॉर्डब्रेक होण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी २७ रोजी रक्तदान शिबीरास उपस्थित राहून सहकार्य करावे आवाहन आभाळमाया ग्रूपच्या वतीने करण्यात येत आहे.
या महारक्तदान शिबीरासाठी गोवा मेडीकल कॉलेज गोवा, बांबुळी , जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग आणि एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज पडवे यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.