22 C
Mālvan
Tuesday, December 24, 2024
IMG-20240531-WA0007
ADVT Natal Jeron F

केंद्राच्या ‘आयुष्यमान भारत ‘ आरोग्य योजनेचा कणकवली मतदारसंघात मिळणार लाभ..!

- Advertisement -
- Advertisement -

१३५० आजारावर ५ लाखापर्यंत उपचार मिळणार मोफत

आम.नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

कणकवली | उमेश परब :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक घटकांचा विचार करून शासकीय योजना राबवित आहेत.” आयुष्यमान भारत” ही विविध १३५० आजारांवर मोफत उपचार देणारी महत्वपूर्ण योजना केंद्र सरकारची आहे.यात ५ लाख रुपया पर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत.ही योजना कणकवली, देवगड,वैभवाडी या आपल्या मतदारसंघात ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या एका महिन्यात रजिस्ट्रेशन करून व आरोग्य कार्ड काढून ही योजना सुरू केली जाणार आहे. मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थींची या योजनेसाठी निवड झाली आहे,त्यांचे राजिस्टेशन करून या योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.ते ‘झूम अँप’ द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आयुष्यमान भारत या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा जनतेला कसा होईल हे स्पष्ट केले. ते म्हणाले, या योजनेचा फायदा जनतेला व्हावा यासाठी कणकवली, देवगड, आणि वैभववाडी या तिन्ही पंचायत समिती मध्ये स्वतंत्र टेबल लावून यंत्रणा कार्यरत केली जाईल.आयुष्यमान भारत चे अधिकारी आणि कर्मचारी तेथे येतील दिवसाला सुमारे १५०० पर्यंत लोकांचे थंब घेऊन हे रजिस्ट्रेशन होईल. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी गावस्थरावर काम करतील आणि ज्यांची नावे या आयुष्यमान भारत च्या योजनेत आलेली आहेत अशा मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थ्यांना टप्प्या टप्प्याने राजिस्टेशन करून घेतील.त्यासाठी रेशनकार्ड किंवा आधार कार्ड चा नंबर देणे गरजेचे आहे.त्यानंतर लाभार्थ्यांची कार्ड येतील ती वाटली जातील मग वर्षभर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत होणार आहेत त्या साठी सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर सह मुंबई ,पुणे येथील रुग्णालये निवडण्यात आली आहेत.मात्र या योजनेत देशातील त्यात्या भागात निवडलेल्या कोणत्याही रुग्णालयात तुम्ही उपचार घेऊ शकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशी १३ रुग्णालये आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ आणि गोव्यातील ३४ रुग्णालये आहेत.तर मुंबईत मधील ५९ रुग्णालये आहेत. शासनाने निवडलेल्या या रुग्णालयात १३५० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार होणार आहेत.ही योजना दोन वर्षे राज्य सरकाने राबविली नाही त्यामुळे राज्यत जनतेचे नुकसान झाले आहे मात्र आता या योजनेचा जनतेला फायदा मिळेलच उपचाराला पैसे नाहीत म्हणून कोणाचे प्राण जाणार नाहीत असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

१३५० आजारावर ५ लाखापर्यंत उपचार मिळणार मोफत

आम.नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

कणकवली | उमेश परब :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक घटकांचा विचार करून शासकीय योजना राबवित आहेत." आयुष्यमान भारत" ही विविध १३५० आजारांवर मोफत उपचार देणारी महत्वपूर्ण योजना केंद्र सरकारची आहे.यात ५ लाख रुपया पर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत.ही योजना कणकवली, देवगड,वैभवाडी या आपल्या मतदारसंघात ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या एका महिन्यात रजिस्ट्रेशन करून व आरोग्य कार्ड काढून ही योजना सुरू केली जाणार आहे. मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थींची या योजनेसाठी निवड झाली आहे,त्यांचे राजिस्टेशन करून या योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.ते 'झूम अँप' द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आयुष्यमान भारत या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा जनतेला कसा होईल हे स्पष्ट केले. ते म्हणाले, या योजनेचा फायदा जनतेला व्हावा यासाठी कणकवली, देवगड, आणि वैभववाडी या तिन्ही पंचायत समिती मध्ये स्वतंत्र टेबल लावून यंत्रणा कार्यरत केली जाईल.आयुष्यमान भारत चे अधिकारी आणि कर्मचारी तेथे येतील दिवसाला सुमारे १५०० पर्यंत लोकांचे थंब घेऊन हे रजिस्ट्रेशन होईल. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी गावस्थरावर काम करतील आणि ज्यांची नावे या आयुष्यमान भारत च्या योजनेत आलेली आहेत अशा मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थ्यांना टप्प्या टप्प्याने राजिस्टेशन करून घेतील.त्यासाठी रेशनकार्ड किंवा आधार कार्ड चा नंबर देणे गरजेचे आहे.त्यानंतर लाभार्थ्यांची कार्ड येतील ती वाटली जातील मग वर्षभर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत होणार आहेत त्या साठी सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर सह मुंबई ,पुणे येथील रुग्णालये निवडण्यात आली आहेत.मात्र या योजनेत देशातील त्यात्या भागात निवडलेल्या कोणत्याही रुग्णालयात तुम्ही उपचार घेऊ शकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशी १३ रुग्णालये आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ आणि गोव्यातील ३४ रुग्णालये आहेत.तर मुंबईत मधील ५९ रुग्णालये आहेत. शासनाने निवडलेल्या या रुग्णालयात १३५० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार होणार आहेत.ही योजना दोन वर्षे राज्य सरकाने राबविली नाही त्यामुळे राज्यत जनतेचे नुकसान झाले आहे मात्र आता या योजनेचा जनतेला फायदा मिळेलच उपचाराला पैसे नाहीत म्हणून कोणाचे प्राण जाणार नाहीत असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!