24.7 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

पर्यटन महासंघाला सर्वोतोपरी मदत केली जाणार : मा.नारायण राणे

- Advertisement -
- Advertisement -

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली एक तास सकारात्मक चर्चा…

मालवण | वैभव माणगांवकर: देशाचे केंद्रीय मंत्री मा. राणेसाहेब दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज पडवे येथील मेडिकल काॅलेजमध्ये महासंघाच्या पदाधिकाऱ्यानी राणे साहेबांची भेट घेऊन महासंघाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी मालवण येथे होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी निमंत्रण स्विकारले मात्र काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकत नसल्याने आपण ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी निश्चित होणार असल्याचे सांगितले.
राणे साहेबांनी या जिल्ह्यात पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली त्या अनुषंगाने पुढील काळात रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून केंद्रीय स्तरावर पर्यटन मंञालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या जिल्ह्यात आणि कोकणातही रोजगाराभिमुख कोणते प्रकल्प आणता येईल याचा आपण प्रयत्न करणार असुन पर्यटन महासंघानेही योग्य दिशेने काम करावे जेणे करून एका वेगळ्या पर्यटन जिल्ह्याची ओळख आपण राष्ट्रीय स्तरावर करूया असेही ते म्हणाले.
सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत त्यांनी जिल्ह्यातील हाॅटेल व्यवसाय, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन, निवास न्याहारी, आदरातिथ्य अशा अनेक विषयांवर इतर देशातील पर्यटनाचा संदर्भ देवून मार्गदर्शन केले.
यावेळी कोकण निसर्ग मंचाचे कार्यवाह व काॅनबॅकचे संचालक श्री मोहन होडावडेकर यांनी राणेसाहेबानां बांबूच्या सुंदर चट ईवर लेझर इनग्रेव्ह केलेले राणे साहेबांचे पोर्टेट भेट म्हणून दिले. तर कोकणस्फुर्तीचे संचालक ऍड. नकुल पार्सेकर यांनी त्यांना जांभूळ मोदक भेट म्हणून दिले. पुढच्या दौऱ्यात आपण काॅनबॅक व कोकणस्फुर्ती या दोन्ही प्रकल्पाना निश्चित भेट देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यानी रापणसंघ आणि हाॅटेल व्यवसायिकांच्या समस्या मांडल्या. याप्रसंगी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष श्री. डि. के. सावंत, साहसी पर्यटन प्रमुख श्री कमलेश चव्हाण, सावंतवाडी अध्यक्ष श्री जितेंद्र पंडित, मालवण अध्यक्ष श्री अविनाश सामंत आदि पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती बाबा मोंडकर,जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ यांनी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!