23.1 C
Mālvan
Saturday, January 11, 2025
IMG-20240531-WA0007

कै. सदाशिव स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिभा कोतवाल याना जाहीर

- Advertisement -
- Advertisement -

उमेश परब / कणकवली : कै. सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीपासून दिला जाणारा पहिला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. शाळा कणकवली क्र 3 च्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका श्रीम. प्रतिभा खंडेराव कोतवाल याना जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ सतीश पवार यांनी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला याबाबतची घोषणा केली आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रीम. प्रतिभा खंडेराव कोतवाल या पदवीधर शिक्षिका सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक तीन तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे कार्यरत असून त्यांची शैक्षणिक अहर्ता एमएस्सी बी एड अशी आहे . त्यांची एकूण सेवा सव्वीस वर्ष झाली असून त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,2020 बोधी ट्री एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद यांचा जीवनगौरव पुरस्कार 2018 प्राप्त झाला आहे.
गेली सव्वीस वर्षे सातत्याने विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन दोन वेळा राज्यस्तरावर अकरा वेळा जिल्हास्तरावर सहभाग त्यांचा सहभाग आहे. भालचंद्र महाराज प्रतिष्ठान आयोजित शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सातत्याने दहा वर्ष मार्गदर्शन विविध शाळाबाह्य निबंध व वक्तृत्व स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इयत्ता सातवी शिष्यवृत्ती एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा एमटीएस परीक्षा इत्यादीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे आजपर्यंत 27 विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेत.
व्यसनमुक्ती स्त्री पुरुष समानता स्वच्छता व आरोग्य इत्यादी विषयावर पथनाट्य लेखन व विद्यार्थ्यांचे मार्फत सादरीकरण लॉकडाउन कालावधीत शिक्षण आपल्या दारी या पंचायत समिती कणकवली च्या उपक्रमात त्यांचा उल्लेखनीय यशस्वी सहभाग आहे.
संशोधनात्मक निबंध लेखन व पुरस्कार पुणे विद्यापीठ व पुढारी आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत एकविसाव्या शतकात उच्च शिक्षणाची दिशा नेमकी काय असावी या या निबंधात उत्तेजनार्थ पुरस्कार 2003 सामाजिक वनीकरण विभागामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत गिधाड संवर्धन काळाची गरज या निबंधात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक 2012 त्यांना प्राप्त झालाय. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या पटसंख्या ची घसरण एक सामाजिक समस्या या विषयावर आयुशी इंटरनॅशनल रिसर्च जनरल मध्ये लेख 2018 प्रसिद्ध झालाय.
माझ्या विद्यार्थ्यांची अविस्मरणीय इस्त्रो सफर या विषयावर जीवन गौरव मासिक लेखन युवा संदेश प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित अभ्यास पुस्तिकेत इयत्ता सहावी व सातवी गणित विषयाच्या अभ्यासक्रमाचे लेखन केले आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षिका असलेल्या शिक्षिका श्रीम प्रतिभा कोतवाल याना प्रतिष्ठान तर्फे लवकरच समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे डॉ सतीश पवार यांनी जाहीर केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!