मसुरे | प्रतिनिधी : कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी मालवण तालुक्यातून राज्यात सर्वप्रथम आंब्याची थेट विक्री करणारे डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या साळेल आणि कुंभारमाठ मधील हापूस आंबा आणि काजू प्रक्षेत्राला भेट देत पाहणी केली. यावेळी विभागीय कृषी अधीक्षक श्री. बालाजी ताटे, पुणे आयुक्त कार्यालयातील एम. आर. जी. एस विभाग तंत्र अधिकारी श्री. डॉ. बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘वसंतसम्राट ‘या नवीन शोध लावलेल्या वाणाची आणि एस. के. यू. या नवीन शेवग्याच्या वाणाची आणि इतर झाडांची पाहणी केली. तसेच बागेचे व्यवस्थापन जाणून घेतले . तसेच फोंडेकर यांच्या कडून हापूस आंब्याच्या पिकाबद्दल माहिती घेतली. यावर्षीच्या हापूस आंब्याच्या पेटीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याबद्दल अधिकाऱ्यांनी श्री फोंडेकर यांना पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्याबरोबर मालवण ता. कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी श्री परब, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, कृषी सहाय्यक किशोर कदम उपस्थित होते.