सरपंच किरण मेस्त्री यांचा पाठपुरावा.
शिरगाव | प्रतिनिधी :देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील शेतकरी श्रीमती सुनिता कांडर यांच्या काजू बागेतील गवा रेड्यांनी काजूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करून नुकसान केले. याची माहिती सरपंच किरण मेस्त्री यांना मिळताच त्यांनी वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून सदरील शेतकरी महिलेला सुमारे १०,००० रू. मिळवून दिले. यावेळी सरपंच किरण मेस्त्री, वन अधिकारी श्री साठे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, नुकसानग्रस्त शेतकरी श्रीमती सुनिता कांडर, ग्रामस्थ सत्यवान कांडर, उदय राणे आदी उपस्थित होते.
यापूर्वीही उन्हाळी शेतीचे गवा रेड्यानी मोठ्या प्रमाणत नुकसान केले त्या ५ शेतकऱ्यांना सरपंच किरण मेस्त्री यांनी जातीनिशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून तत्काळ पंचनामा करून त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ४ ते ५ हजारांची नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. तसेच गवा रेड्यांनी काही शेतकऱ्यांच्या बागेची नासधूस केली त्या शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली त्याबद्दल सरपंच किरण मेस्त्री यांनी संबधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. तसेच ग्रामस्थांनी वन विभाग अधिकारी व सरपंच किरण मेस्त्री यांची प्रशंसा केली आहे.