श्री. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख तउद्योजक श्री दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ७ जानेवारी रोजी घुमडाई मंदिर, घुमडे येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. दत्ता सामंत मित्रमंडळ व शिवसेना यांच्या द्वारे आयोजीत या रक्तदान शिबिराचा उद्घाटन समारंभ प्रसंगी श्री. दत्ता सामंत, मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे व मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरात अचानक मित्रमंडळ, वायरीचे सभासद आशीर्वाद लुडबे, अविनाश खानोलकर, आकांक्षा खानोलकर, आनंद जोशी, शानू वालावलकर यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. त्यांना रक्तदान प्रमाणपत्र देण्यात आले. अचानक मित्रमंडळ वायरी यांच्यावतीने श्री दत्ता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा रक्तपेढी व सीपीअर कोल्हापूरचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच उमेश बिरमोळे, राजू बिडये, बाळा माने, भाऊ सामंत, श्री साळगावकर, दत्ता सामंत मित्रमंडळी उपस्थित होती अशी माहिती अचानक मित्रमंडळ वायरीचे सभासद शानू वालावलकर यांनी दिली आहे.