मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री मालवण शहरातील नागरीकांच्या समस्यांची पहाणी केली. बंदर जेटी येथील बंद अवस्थेतील लाईट, मच्छी मार्केट परिसरातील अस्वच्छता, कचर्याचे ढीग, सेल्फी पाॅईंटची दुरावस्था, कचरा व्यवस्थापन मशीन तसेच बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाची त्यांनी पहाणी तसेच मोकाट जनावरे समस्या जाणून घेतली व पहाणी केली. बंदर जेटी परिसर स्वच्छ व सुशोभित कसा करता येईल याबाबत त्यांनी माहिती घेतली.
मालवण नगरपरीषद येथील नवीन इमारत उभारणी सुरू असून ती रखडली आहे. या सर्वाबाबत प्रशासनाशी चर्चा करून सूचना देणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. व्यापारी व नागरीकांतून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी आमदार निलेश राणे आणि माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, बबन शिंदे, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर, ललित चव्हाण, विषय पालेकर, अमोल केळुसकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.