मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषदेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत मालवण शहर पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरण यासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवारी या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेवक अशोक तोडणकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, बबन शिंदे, राजा गावकर, विश्वास गावकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेविका, महानंदा खानोलकर, किसन मांजरेकर, किशोर खानोलकर, सोनाली पाटकर, पूजा वेरलकर, राकेश सावंत, निशय पालेकर, ललित चव्हाण तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अभिषेक इन्फ्राचे अभिषेक घाग, निशांत घाग, विनोद भुरण, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार डी पी. पाटकर आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते नगरपालिकेचे अधिकारी, अभिषेक इन्फ्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच अधिकारी वर्गाने प्रामाणिकपणे काम करावे असे सांगितले. मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.