सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी आठवडा बाजारात युवतीचे फ़ोटो काढणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याला संतप्त झालेल्या नागरिकांनी बेदम चोप दिलाय. यावेळी त्याच्या मोबाईल मध्ये फोटो आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील श्रीराम वाचन मंदिर समोर घडला. याबाबत संबंधित मुलाने आक्रमक आपण त्या युवकाच्या विरोधात तक्रार देणार असल्याची भूमिका घेतली आहे. तात्काळ वाहतूक पोलीस सखाराम भोई यांनी घटनास्थळी धाव घेत त्या युवकाला ताब्यात घेतले. संबंधित मुलगी ही कामानिमित्त सावंतवाडीत आली होती. यावेळी नातेवाईक बाजारात असल्यामुळे ती वाचन मंदीर परिसराच्या कठड्यावर काही वेळ बसली होती. यावेळी ती एकटा असल्याचे लक्षात येताच हा प्रकार केला. मात्र नागरिक व बाजूला असलेल्या स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्या सर्वांनी मिळून त्याला चांगला चोप दिला.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -